गोंदिया - आज गोंदियात कुणबी समाजाचे सभागृह, ( Gondia Kunbi Sabhagruha ) वाचनालय व वसतिगृह बांधण्यात येत असून यासाठी कोणी किती निधी दिला, याची यादी आयोजकांनी वाचली. यावेळी बोलताना 'दान गुप्त ठेवा, उघड़ करू नका. नाही तर ईडी मागे लागते' असा उपरोधक टोला नाना पटोले ( Nana Patole Critisized ED ) ईडीच्या कार्यप्रणालीवर लगावला आहे. गोंदियातील कुणबी मेळाव्याच्या ( Godia Kunbi Melava ) जाहीर सभेत ते बोलत होते.
'भाजपाने जनेताल एप्रिलफूल बनवले'- भाजपाने या देशातील जनतेला एप्रिल बनवले असून दररोज देशातील जनता एप्रिल फूलमध्ये जगत आहे. तर ज्या घोषणा भाजपाने करून केंद्रात सत्तेवर आलेत. त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांना नावे ठेवण्यात काही अर्थ नसून भाजपा नेत्यांनी टिंगलटवाळी सोडून महागाई, बेरोजगारीवर चर्चा करावी, असा सल्ला नाना पटोले यांनी दिला.
'ईडीच्या विरोधात सुमोटा याचिका दाखल करावी'- ज्याप्रमाणे केंद्रातील भाजपा सरकार केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरूपयोग करून देशामध्ये दहशत निर्माण करत आहे, तेव्हा सुप्रीम कोर्टाने सुमोटो याचिका दाखल करून हस्तक्षेप करण्याची मागणी नाना पटोले यांनी केली. देशातील लोकशाहीच धोक्यात आली असून आता मुख्य न्यायाधीशांनी यात हस्तक्षेप करावा, असेही ते म्हणाले
'विरोधकांना बोलवायची गरज नाही'- आज गुडी पाडव्याच्या निमित्ताने मुंबई मेट्रो 2 व 7 चे उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या पत्रिकेवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा नाव नसल्याने भाजपने सरकारवर टीका केली आहे. तर प्रोटोकॉल असतो, त्यामध्ये विरोधकांना बोलवायची गरज नाही, असा टोलाही नाना यांनी लगावला आहे.
हेही वाचा -Sharad Pawar : धर्मांध वृत्तीच्या विरोधात आता लढाई लढावी लागेल - शरद पवार