गोंदिया- जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणत वाढत आहे. जिल्ह्यात कोरोनाची साकळी तोडण्यासाठी प्रशासन अॅक्टीव्ह मोडवर आले आहे. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेअंतर्गत १० हजार कर्मचारी साधणार गृहभेटीतून लोकांशी संवाद साधणार आहेत. जिल्ह्यात आतापयर्यंत ७ हजार २५१ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १०२ लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर ५ हजार ३१३ लोकांनी कोरोनावर माता केली असून आपल्या घरी परतले आहेत. सध्याच्या घडीला एक हजार ८३६ रुग्ण क्रियाशील आहेत.
गोंदियात १० हजार कर्मचारी साधणार गृहभेटीतुन संवाद आज ३ ऑक्टोबरला 'माझे कुटूंब माझी जबाबदारी' या मोहिमेतंर्गत १० हजार कर्मचारी हे थेट गृहभेटी देत जिल्ह्यातील तब्बल दहा लाख नागरिकांपर्यंत पोहचून प्रशासनाद्वारे जनजागृती करणार आहेत. आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास गोंदिया शहरातील महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन सदर मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
कोविड -१९ च्या पार्श्वभुमीवर आरोग्य सर्व्हेक्षण करण्यासाठी संपुर्ण राज्यात माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातही सर्व्हेक्षण करण्यात येत असुन जिल्ह्यातील दहा लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या मोहिमेत पोलीस विभागातील कर्मचारी व अधिकारीही सहभागी झाले आहेत.
लोकांना कोविड-१९ बाबत साक्षर करण्याच्या या मोहिमेत पोलिस विभाग, शासकीय कर्मचारी, क्रिडा मंडळ, गणेश मंडळ, दुर्गा मंडळ, बचतगट, व्यापारी संघटना, राजकीय प्रतिनधी, सामाजिक संस्था व महाविद्यालयीन विद्यार्थी अशा एकूण १० हजार लोकांच्या सहकायार्ने थेट गृहभेटी करण्यात येणार आहे. एका कुटुंबाला भेट दिल्यानंतर त्या कुटुंबाने शेजारच्या १० कुटुंबाना अभियानाची माहिती पोहोचवावी, असे आवाहन यावेळी करण्यात येईल. त्यामुळे साधारणत: १० लाख लोकांपर्यंत एकाच दिवसात हा उपक्रम पोहोचेल. व जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोनाला ब्रेक लागण्यास मदत होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.