गोंदियात काठीने ठेचून तरुणाचा खून; आरोपीला अटक - गोंदियात काठीने ठेचून तरुणाचा खून
जुन्या वादाच्या राग मनात ठेवून त्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने लाठ्या-काठ्या, दगड-विटांनी जबर मारहाण करून एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. ही घटना 5 मे रोजी गांधी वॉर्ड, जुना गोंदिया येथे घडली आहे. यातील मृतकाचे नाव सुधीर रमेश सूर्यवंशी (वय 37, रा. गांधी वॉर्ड, जुना गोंदिया) असे आहे. तर आरोपीचे नाव संतोष उर्फ पद्दु गोपाल बंसोड (वय 21 रा. गांधी वॉर्ड, जुना गोंदिया) असे आहे.
गोंदिया -जुन्या वादाच्या राग मनात ठेवून त्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने काठीने, दगडाने जबर मारहाण करून एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. ही घटना 5 मे रोजी गांधी वॉर्ड, जुना गोंदिया येथे घडली आहे. यातील मृतकाचे नाव सुधीर रमेश सूर्यवंशी (वय 37, रा. गांधी वॉर्ड, जुना गोंदिया) असे आहे. तर आरोपीचे नाव संतोष उर्फ पद्दु गोपाल बंसोड (वय 21 रा. गांधी वॉर्ड, जुना गोंदिया) असे आहे. या प्रकरणी गोंदिया शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अवघ्या 2 तासांत आरोपीला अटक केली आहे. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे व इतर वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनात गुन्ह्याच्या तपासाची सूत्रे हलवून गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व स्टाफ यांनी आरोपीचा शोध घेतला. अटक आरोपीवर यापूर्वी सुद्धा विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.