गोंदिया - राज्यसभा खासदार प्रफुल पटेल ( Praful Patel ) यांच्या गोंदियातील सी. जे कंपनीच्या ( C. J Company ) नावाने डुप्लिकेट बिडी ( Police raid on duplicate bidi factory ) तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकत एका आरोपीला अटक केली आहे. डुप्लिकेट बिडी तयार करण्यासाठी वापरला जाणारे साहित्य देखील मोठ्या प्रमाणात जप्त केले आहे. खा. प्रफुल पटेल यांच्या वडिलाणाच्या नावाने सी. जे कंपनीने मनोहर बिडी ( Manohar Bidi ) बाजारात चलनात आणली असून त्याला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. याचा फायदा घेत आरोपींनी नकली बिडी तयार करण्याचे काम केले आहे.
Raid On duplicate Bidi Factory: प्रफुल पटेल यांच्या कंपनीच्या नावाने नकली बिडी तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा - Praful Patel
राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल ( Praful Patel ) यांच्या सी. जे कंपनीच्या नावाने डुप्लिकेट बिडी तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांची धाड ( Police raid on duplicate bidi factory ) टाकली आहे. या प्ररकरणी एका आरोपीला केली अटक केली असून मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यात बिड्यांची विक्री होत असल्याची माहिती मिळते आहे.
![Raid On duplicate Bidi Factory: प्रफुल पटेल यांच्या कंपनीच्या नावाने नकली बिडी तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा c J company](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16002770-thumbnail-3x2-bidi.jpg)
गोंदिया जिल्याच्या आमगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या कुंभारटोली गावातील सुनील बोरकर ह्या इसमाने प्रकार केला आहे. त्यांने बिर्शी गावात एक भाड्याची खोली घेत, या ठिकाणी मनोहर फोटो बिडी, २७ नंबर स्पेशल बिडी, मंकी बॉय बिडी या सारख्या नामंकित ब्रॅाण्डचे बनावट स्टिकर तयार केले. सदरील आरोपींने गावात महिलांकडून डुप्लिकेट बिडी तयार तयार करून घेतली. त्यानंतर बिड्यांवर बनावट स्टिकर लावत बिड्यांची विक्री करीत असल्याची माहिती मिळत आहे. गोंदियातील सी. जे कंपनीचे मुकेश पटेल यांना माहिती मिळताच यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी बिर्शी गावातील कारखान्यावर धाड टाकत एका आरोपीसह डुप्लिकेट बिडी तयार करण्यासाठी वापरण्यात येणार साहित्य देखील जप्त केले आहे. तर, डुप्लिकेट बिडी महाराष्ट्रासह, मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यात विक्री करत असल्याची माहिती आरोपींनी दिली आहे. यामध्ये आणखी आरोपी असण्याची शक्यता असल्याचे सी. जे कंपनीचे व्यवस्थापक मुकेश पटेल यांनी म्हटले आहे.