गोंदिया - आमगाव तालुक्यातील आमगाव खुर्द येथे एका मोबाईल दुकानात चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. भाटीया ट्रेडर्स या दुकानातून चोरट्यांनी 9 जानेवारीला 8 लाख 25 हजार 611 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अर्जुनी मोरगाव व केशोरी परिसरात सापळा रचून अटक केली आहे. विष्णू खोकन, पिंकू नरेंद्र मिस्त्री, सुरज चित्तरंजन विश्वास अशी आरोपींची नावे आहेत.
मोबाईल चोरट्यांच्या टोळीला अटक, ८ लाखांचा मुद्देमाल जप्त - mobile theft news gondia
आमगाव तालुक्यातील आमगाव खुर्द येथे एका मोबाईल दुकानात चोरी करणारऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. भाटीया ट्रेडर्स या दुकानातून चोरट्यांनी 9 जानेवारीला 8 लाख 25 हजार 611 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.
सालेकसा तालुक्यातील आमगावखुर्द येथील भाटीया ड्रेडर्स मोबाईल दुकानाच्या शटरचे कुलुप तोडून चोरांनी आत प्रवेश केला. त्यांनी 77 नग मोबाईल ज्याची किंमत आठ लाख नऊ हजार 611, रोख चार हजार रुपये व 12 हजारांचे साहित्य असा एकूण आठ लाख 25 हजार 611 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी फिर्यादी मनप्रितसिंग भाटीया यांनी सालेकसा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी एका मोबाईल रिपेअरिंग सेंटरमध्ये मोबाईल विक्री केल्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी 50 नग मोबाईल किंमत 6 लाख 92 हजार 327 व अतिरक्त 30 मोबाईल किंमत 3 लाख 32 हजार 228 असा एकूण 10 लाख 24 हजार 555 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केल्यावर 26 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.