गोंदिया- देशात कोरोना विषाणूला पायबंद घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडऊनचा परिणाम रोजंदारीवर काम करून उदरनिर्वाह करणाऱ्यांवर झाला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे, अशा कुटुंबांची मदत करण्यासाठी गोंदिया विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी पुढाकार घेत कुटुंबांना शिधावाटप केली आहे.
आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडून रोजंदारीवर काम करणाऱ्यांना शिधावाटप - mla vinod agraval
आमदार विनोद अग्रवाल यांनी सामाजिक बांधिलकी जपत शहर परिसरातील रोजंदारीवर काम करणाऱ्यांच्या घरी जाऊन प्रती व्यक्ती ५ किलो तांदूळ आणि हात धुण्यासाठी साबण दिले.
शिदा वाटप करताना आमदार अग्रवाल
आमदार विनोद अग्रवाल यांनी शहर परिसरातील रोजंदारीवर काम करणाऱ्यांच्या घरी जाऊन प्रती व्यक्ती ५ किलो तांदूळ आणि हात धुण्याकरिता साबण दिले. याद्वारे आमदार विनोद अग्रवाल यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.