महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पूर्व विदर्भात पहिल्यांदाच जनसंवाद सभेचे आयोजन; आमदार राजकुमार बडोलेंनी केले आयोजन

शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आमदार राजकुमार बडोले यांनी अर्जुनी मोरगाव येथे प्रथमच किसान जनसंवाद सभेचे आयोजन केले. या जनसंवाद सभेला शेकडो शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांनी सभेत भाग घेत विविध योजनांची माहिती जाणून घेतली.

आमदार राजकुमार बडोले

By

Published : Aug 24, 2019, 9:33 PM IST

गोंदिया- महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना थेट शेतकऱ्यांपर्यत पोहोचाव्यात. त्यांना या शासकीय योजनांचा लाभ मिळावा. यासाठी गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांनी अर्जुनी मोरगाव येथे प्रथमच किसान जनसंवाद सभेचे आयोजन केले.

सभेबद्दल माहिती देताना आमदार राजकुमार बडोले व शेतकरी बंधू

या जनसंवाद सभेला शेकडो शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांनी सभेत भाग घेत विविध योजनांची माहिती जाणून घेतली. यात केंद्र आणि राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी कर्जमुक्ती योजना, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, शेतकरी विमा योजना आदी विषयांवर या जनसंवाद सभेत चर्चा झाली. अधिकारी आणि लोक प्रतिनिधी यांनी शेतकऱ्यांना योजना समजावून सांगितल्या. शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने योजनांचा लाभ घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details