गोंदिया - गोंदिया तालुक्यातील (जिल्हा परिषद शाळा चंगेरा)येथे धक्कादायक प्रकार समोर आला. येथे चक्क वर्ग एक ते आठच्या विद्यार्थ्यांसाठी पुरवण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या धान्यात मोठ्या प्रमाणात कचरा, धूळ, सिमेंट व गुटख्याचे पाऊच आढळे आहेत. (दि. 15 मार्च)रोजी मुख्याध्यापक व सरपंचांनी पाहणी केले तेव्हा हा प्रकार समोर आला. (School Nutrition In Gondia District) या सर्व प्रकरणाचे 'ETV भारत'ने सविस्तर वृत्त दिले होते. (Mla Dr. Parinee Phuke) या वृत्ताची दखल घेत माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी विधानपरिषदेत हा मुद्दा उपस्थित करत संबंधित कंत्राटदारावर करडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कंत्राटदाराला यापुढे कोणतेही कंत्राट मिळू नये
या प्रकारामुळे गावासह तालुक्यात एकच खळबळ उडाली. कंत्राटदार श्रीहरी राईस अॅंड ऍग्रो लिमिटेड अस या कंत्राटदार कंपनीचे नावर आहे. फुके यांनी सध्या सरू असलेल्या विधानपरिषदेत हा मुद्दा उचलून धरला व संबंधित पोषण आहार कंत्राटदारावर कार्यवाही करण्यात यावी तसेच, त्यावर निर्बंध आणावेत अशीही मागणी केली आहे. (School Nutrition In Legislative Council) तसेच, त्या कंत्राटदाराला यापुढे कोणतेही कंत्राट मिळू नये असे म्हणत या प्रकरणाची चौकशी करून त्याच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी भूमिका फुके यांनी आपल्या निवेदनात घेतली आहे.
काय होता प्रकार ?