गोंदिया- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीत नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे, यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. गोंदिया मतदारसंघाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी आपल्या मतदार संघासाठी स्वखर्चातून 4 हजार लिटर जंतूनाशक विकत घेत फवारणीसाठी मतदार संघात दिले.
आमदार अग्रवाल यांनी निर्जंतुकीकरणासाठी खरेदी केले 4 हजार लिटर जंतूनाशक - गोंदिया मतदार संघाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल
आपल्या विधानसभा मतदारसंघात फवारणी करण्यासाठी 4 हजार लिटर जंतूनाशक खरेदी केले.
फवारणी करताना
कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. याचे प्रसार थांबावे यासाठी शासनाकडून सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. गोंदिया जिल्ह्यात एक कोरोनाग्रस्त आढळल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. म्हणून आमदर विनोद अग्रवाल यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या एक नगर परिषद, 86 ग्रामपंचायत तसेच 10 प्राथमिक आरोग्य केंद्राला जंतू नाशकाचे वितरण केले.
हेही वाचा -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारणी
Last Updated : Apr 4, 2020, 10:19 AM IST