महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदिया : मीरावंत रुग्णालयाची ‘खासगी डेडिकेटेड कोविड-19 हॉस्पिटल’ची मान्यता रद्द - gondia covid news

मीरावंत हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता अवाजवी रक्कम वसूल करण्यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची जिल्हा प्रशासनाकडून गंभीर दखल घेऊन मान्यता तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आली आहे.

Mirawant Hospital has been derecognized
गोंदिया : मीरावंत रुग्णालयाची ‘खासगी डेडिकेटेड कोविड-19 हॉस्पिटल’ची मान्यता रद्द

By

Published : May 23, 2021, 6:48 PM IST

गोंदिया -कोरोनाबाधित रूग्णांच्या उपचारासाठी येथील मीरावंत रुग्णालयाला 'खासगी डेडिकेटेड कोविड-19 हॉस्पिटल'ची मान्यता देण्यात आली होती. परंतु या रुग्णालयात उपचाराकरिता अवाजवी रक्कम वसूल करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने जिल्हा प्रशासनाने या रुग्णालयाची 'डेडिकेटेड कोविड-19 हॉस्पिटल'ची मान्यता 19 मे रोजीपासून रद्द केली.

तत्काळ प्रभावाने मान्यता रद्द -

जिल्हा प्रशासनाकडून कोविड-19 बाधित रुग्णांच्या उपचारासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे खासगी डेडिकेटेड कोविड-19 हॉस्पिटल म्हणून डॉ.राजेंद्र वैद्य यांच्या मीरावंत हॉस्पिटलला परवानगी देण्यात आली होती. परंतु या रुग्णालयात उपचाराकरिता अवाजवी रक्कम वसूल करण्यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच 16 मे 2021 रोजी मृत्यू झालेल्या एका रुग्णाचा मृतदेह दिवसभर गोंदिया नगर परिषदेला हस्तांतरीत न केल्याचा प्रकारही त्यांच्याकडून घडला होता. या प्रकरणांची जिल्हा प्रशासनाकडून गंभीर दखल घेऊन साथरोग प्रतिबंधक अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये या रुग्णालयाची खासगी डेडिकेटेड कोविड-19 हॉस्पिटल असलेली मान्यता तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आली आहे.

हेही - ब्लॅक, व्हाईटसह ग्रीन, रेड, पिंक आणि ब्लू फंगसचाही धोका

ABOUT THE AUTHOR

...view details