गोंदिया- देशातील 17 ते 18 राज्यात लोडशेडींग सुरू आहे. राज्यातील महाराष्ट्र वीज वीज वितरण कंपनीने तसेच राज्य शासनाने अत्यंत व्यवस्थितपणे काम करत मागील काही दिवसांपासुन आपल्याकडे भारनियमन बंद आहे. भविष्यात देखील लोडशेडींग होणार नाही, यासाठी प्रयत्न चालू आहेत. कोळशाची परिस्थिती बघता ते केंद्र सरकारचे काम आहे. केंद्राकडून कोळशाचा पुरवठा कमी होत राज्यापुढे विजेचे संकट निर्माण होत असले तरी महाराष्ट्राला लोडशेडींग पासून वाचविण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांनी गोंदियात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
भविष्यात महाराष्ट्रात भारनियमन होणार नाही; राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे - राज्यात विजेचे संकट
भविष्यात देखील लोडशेडींग होणार नाही, यासाठी प्रयत्न चालू आहेत. कोळशाची परिस्थिती बघता ते केंद्र सरकारचे काम आहे. केंद्राकडून कोळशाचा पुरवठा कमी होत राज्यापुढे विजेचे संकट निर्माण होत असले तरी महाराष्ट्राला लोडशेडींग पासून वाचविण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांनी गोंदियात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
![भविष्यात महाराष्ट्रात भारनियमन होणार नाही; राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15162439-thumbnail-3x2-gonm.jpg)
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
भविष्यात महाराष्ट्रात भारनियमन होणार नाही
राज ठाकरेंना सभा घेण्यासाठी वेळ - केंद्र सरकार राज्याला पुरेसा कोळसा देत नाही. महागाई वाढत चाललेली आहे. पेट्रोल, डिझेलचे भाव वाढत चाललले आहे. ते कमी झाले पाहीजेत. राज्याने गँस कमी केलेली सबसिडी केंद्राने वाढविली. हा मुद्दा महत्वाचा असताना राज ठाकरेंना सभा घेण्यासाठी वेळ आहे. मात्र या महत्वाच्या मुद्द्यांकडे त्यांचे लक्ष नसल्याची टीका तनपूरे केली.