महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ही असली भाजप व नकली भाजपमधील लढाई - अग्रवाल

गोंदियात आमदार गोपालदास अग्रवाल यांना भाजपने उमेदवारी दिल्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी बंडखोरी केली आहे. ते उद्या शक्ती प्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

गोंदीयात असली भाजप विरुद्ध नकली भाजप असा सामना

By

Published : Oct 2, 2019, 2:48 PM IST

Updated : Oct 2, 2019, 11:18 PM IST

गोंदिया - काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत, मंगळवारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा उपस्थितीत गोंदिया लोकलेखा समितीचे अध्यक्ष व गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार गोपाल अग्रवाल यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. त्यांना भाजप कडून उमेदवारी नक्की मानली जात आहे. मात्र, असे असले तरीही या ठिकाणी माजी भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल या सिटीसाठी दावेदार मानले जात होते. त्यांना आता गोंदिया विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी पक्षाविरोधात जात बंडखोरी केली आहे. ते येत्या ३ ऑक्टोबरला शक्ती प्रदर्शन करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे गोंदियाचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

गोंदीयात असली भाजप विरुद्ध नकली भाजप असा सामना

एकीकडे काँग्रेस पक्षाचा आमदारकीचा राजीनामा देत गोपालदास अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्यांचा उपस्थित भाजप मध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांच्या भाजप प्रवेशामुळे त्यांची तर्फे गोंदिया विधानसभा क्षेत्राची उमेदवारी निश्चति मानली जात आहे. दुसरीकडे भाजप कढून इच्छुक उमेदवार व माजी भाजप जिल्हा अध्यक्ष यांनी यावर आपत्ती दर्शवत पक्षासोबत बंडखोरी करत येत्या ३ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आज गोपालदास अग्रवाल यांनी मुहूर्तचा उमेदवारी अर्ज भरत ४ ऑक्टोबर ला शक्तीप्रदर्शन करीत भाजप तर्फे एबी फार्म भरणार असल्याची माहिती दिली आहे.

माजी काँग्रेस आमदार गोपालदास अग्रवाल यांचा सुरुवातीपासूनच भाजप कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध होत असल्यामुळे विरोध असताना पक्ष श्रेष्टींनीं घेतलेला निर्णय कितपत योग्य असा सवाल विनोद अग्रवाल समर्थक व भाजप कार्यकर्ते करत आहेत. एकंदरीतच आज दोन्ही उमेदवारांनी शहरात शक्तिप्रदर्शन करत कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा आपल्या उमेदवारीच्या आशा पल्लवित केल्या. मात्र, येत्या ३ ऑकटोबरला भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष्यानी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत निवडणूक लढल्यास त्याचा तोटा भाजप उमेदवाराला नक्की होईल. त्यामुळे आता भाजप त्यांची मनधरणी कशी करते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Last Updated : Oct 2, 2019, 11:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details