गोंदिया - कौटुंबिक वादातून दिलीप डोंगरे या व्यक्तीने पत्नीच्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांसमोरच कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केल्याने इरीटोला गावात एकच खडबड उडाली आहे. सदर घटना ही शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वत:च्या डोळ्यांनी पाहीली असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. सध्या विद्यार्थ्यांना गावातील दुसऱ्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. प्रतिभा डोंगरे असे मृत शिक्षिकेचे नाव असून दिलीप डोंगरे असे या खूनी पतीचे नाव आहे.
प्रतिभा डोंगरे रोजच्या प्रमाणे मंगळवारी सकाळी १० वाजता इरीटोला गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत आल्या. शाळेत प्रार्थना आटोपल्यावर सर्व विद्यर्थी वर्गखोलीत गेले आणि ज्ञानार्जनाला सुरवात झाली. प्रतिभा यांच्या सहकारी शिक्षिका गार्गी कुंभरे यांनी देखील विद्यर्थ्यांना शिकवायला सुरवात केली. थोड्याच वेळात प्रतिभा डोंगरेचा पती दिलीप शाळेत आला आणि प्रतिभाला अॉफिसरूममध्ये बोलविले. दोंघानमध्ये पैस्याच्या मागणीला घेऊन शाब्दिक वाद झाले. भांडण इतके विकोपाला गेले कि, दिलीप ने प्रतिभाच्या डोळ्यात मिर्ची पॉडर टाकले. त्यानंतर तिला खाली पाडत कुऱ्हाडीने गळ्यावर आणि डोक्यावर वार केले. हा सर्व प्रकार चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वतः पहिला. तर, बाजुच्या वर्गखोलीत शिकवीत असेलल्या शिक्षिकेला भांडणाचा आवाज येताच त्यांनी याची माहिती केंद्र प्रमुखाने दिली. मात्र पाच मिनटात प्रतिभा रक्ताच्या थारोड्यात मृत पडली होती तर आरोपी दिलीप ने घटनासथळावरून पळ काढला. विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने बुधवारी मुलांना गावातील दुसऱ्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे.