महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'बम बम भोले'.. पंचमुखी पुरातन शिवकालीन मंदिरात परराज्यातूनही मोठी गर्दी - Panchamukhi tempal gondia

महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि विविध भागातील भाविकांनी महाशिवरात्रीनिमित्त नागरा येथील पंचमुखी मंदिरामध्ये गर्दी केली आहे.

mahashivaratri
'बम बम भोले'.. पंचमुखी पुरातन शिवकालीन मंदिरात परराज्यातूनही मोठी गर्दी

By

Published : Feb 21, 2020, 9:56 AM IST

गोंदिया -नागरा येथील पंचमुखी मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी काल (गुरुवारी) मध्यरात्रीपासून मोठी गर्दी केली आहे. शिवलिंगाचे दर्शन घेण्याकरिता महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि विविध भागातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात या मंदिरात गर्दी केली आहे. 'बम बम भोले'च्या गजराने परिसर दुमदूमन निघाला असून, भाविकांच्या चेहऱ्यावरील भक्ती भाव त्यांच्या प्रतिक्रियेतून दिसत आहे.

'बम बम भोले'.. पंचमुखी पुरातन शिवकालीन मंदिरात परराज्यातूनही मोठी गर्दी

हेही वाचा - महाशिवरात्री उत्सव : जाणून घ्या देशातील १२ ज्योतिर्लिंगांविषयी

महाशिवरात्रीनिमित्त पंचमुखी मंदिरामध्ये मध्यरात्रीपर्यंत भाविक दर्शन घेणार असल्याने मंदिर आज खुले राहणार आहे. या मंदिराची वास्तू दगडात बांधलेली आहे. अत्यंत मनमोहक असे या मंदिराचे बांधकाम आहे. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गीताप्रेस गोरखपूर येथे प्रकाशित होणाऱ्या कल्याण मासिक १९५१ पत्रिकेमध्ये या मंदिराचा उल्लेख केला आहे. यावरून हे मंदिर किती प्राचीन आहे हे लक्षात येते.

हेही वाचा -प्रेरणादायी! नोकरीच्या मागे न लागता पडीक जमिनीवर फुलवला लघु उद्योगाचा 'बहर'

ABOUT THE AUTHOR

...view details