महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्र वर्धापन दिन : इतिहासात पहिल्यांदाच गोंदियात 'असा' साजरा झाला महाराष्ट्र दिन - gondia news

आज 1 मे म्हणजेच 'महाराष्ट्र राज्य स्थापना दिन'. यावर्षी आपल्या राज्याचा 60 वा स्थापना दिवस आहे. मात्र, कोरोनामुळे यावर्षी हा दिवस सर्वत्र अगदी साधेपणाने आणि फक्त जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण करुन साजरा होत आहे.

maharashtra day flag hoisting done only at collector headquarters in gondia
गोंदिया जिल्हा मुख्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

By

Published : May 1, 2020, 10:46 AM IST

गोंदिया - कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी आज १ मे म्हणजेच महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन सर्वत्र अत्यंत साधेपणाने सादरा होत आहे. गोंदियातील जिल्हाधिकारी कार्यालयात देखील महाराष्ट्र राज्य स्थापना दिन साजरा करण्यात आला आहे. यावेळी जिल्ह्यात इतिहासात पहिल्यांदाच केवळ जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळत कमी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.

गोंदिया जिल्हा मुख्यालयात महाराष्ट्र दिन साजरा...

हेही वाचा...विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर करा, राज्यपालांचे निवडणुक आयोगाला पत्र

राज्य शासनाकडून यावर्षी महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र दिनानिमित्त केवळ जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणीच ध्वजारोहण करण्याबाबत सांगण्यात आले होते. त्यानुसार आज सकाळी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात अन्य कोणत्याही ठिकाणी महाराष्ट्र दिनाचे कार्यक्रम करण्यात आले नाहित.

ABOUT THE AUTHOR

...view details