महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharaj Molesting Woman Gondia : महिलेशी छेडखानी करणाऱ्या महाराजाला नागरिकांनी बेदम चोपले

गोंदिया तालुक्यातील अर्जुनी येथील एक महाराज गेल्या सात वर्षांपासून पीडित महिलेच्या शेजारी असलेल्या एका घरी पूजापाठ करण्याकरीता येत होता. त्यामुळे हळूहळू त्याची ओळख पीडित महिलेसोबत झाली. या महिलेचा मुलगा चिडचिड्या स्वभावाचा असल्याने तिनेही या महाराजाकडून पूजापाठ करण्याचा बेत आखला. गुरुवारी ठरल्याप्रमाणे महाराजाला पीडित महिलेने आपल्या पूजेकरिता बोलाविले होते. पुढे असे काही झाले वाचा...

Maharaj Molesting Woman Gondia
छेडखानी करणाऱ्या महाराजाला नागरिकांनी बेदम चोपले

By

Published : Jan 8, 2022, 5:47 PM IST

Updated : Jan 13, 2022, 7:49 PM IST

गोंदिया - महिलेची छेड करणाऱ्या महाराजाला जमावाने चांगलाच चोप ( Maharaj Molesting Woman Gondia ) दिला आहे. ही घटना गोंदिया तालुक्यातील अंभोरा येथे घडली. या घटनेचा समाज माध्यमातून व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल झाला.

महिलेशी छेडखानी करणाऱ्या महाराजाला नागरिकांनी बेदम चोपले

महाराजाकडून पूजापाठ -

गोंदिया तालुक्यातील अर्जुनी येथील एक महाराज गेल्या सात वर्षांपासून पीडित महिलेच्या शेजारी असलेल्या एका घरी पूजापाठ करण्याकरीता येत होता. त्यामुळे हळूहळू त्याची ओळख पीडित महिलेसोबत झाली. या महिलेचा मुलगा चिडचिड्या स्वभावाचा असल्याने तिनेही या महाराजाकडून पूजापाठ करण्याचा बेत आखला. गुरुवारी ठरल्याप्रमाणे महाराजाला पीडित महिलेने आपल्या पूजेकरिता बोलाविले होते.

जमावाने महाराजाला चांगलाच दिला चोप -

दुपारी तीननंतर पूजापाठ सुरू असताना या महाराजाने महिलेसोबत छेडखानी करीत अभद्र व्यवहार केला. हा प्रकार तिच्या पतीच्या लक्षात येताच त्याने महाराजाला घराबाहेर काढले. हळूहळू ही वार्ता गावात पसरली. गावकऱ्यांनी घटनास्थळी गोळा होत महाराजांना चांगलाच चोप दिला. पीडित महिलेने देखील महाराजाला चपलेने मारहाण केला. तिला महाराजाने पाया पडून माफी मागावी, अशी मागणी करतानाच जमावाने महाराजाला चांगलाच चोप दिला. याचा व्हिडियो अंभोरा, अर्जुनी परिसरातच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडिओ नानाविध चर्चेला उधाण आले. मात्र या संदर्भात पीडित कुटुंबीयानी आद्यपही पोलिसात तक्रार दिली नाही.

आपसात समझोता, तक्रार दाखल करणार नकार -

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नेमके काय घडले, याची शहानिशा केली. दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. यावेळी दोन्ही पक्षांनी पोलीस ठाण्याच्या फाटकासमोर आपसांत समझोता केला. पीडित महिलेने तक्रार दाखल करणार नसल्याचे सांगितल्याने तक्रार नोंदवून घेतली नाही.

हेही वाचा -RABRI DEVI CONTROVERSY : राजदने सुनावले राबडी देवीचे नाव घेण्या आधी विचार करायला हवा होता

Last Updated : Jan 13, 2022, 7:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details