महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदियात कोरोना लस वाया जाण्याचे प्रमाण सर्वात कमी, गडचिरोलीमध्ये लसींची सर्वाधिक नासाडी - गोंदिया लसीकरण न्यूज अपडेट

देशात गेल्या वर्षीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. शासनाने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात केली आहे. सुरुवातीला वैद्यकीय कर्मचारी आणी फ्रंटलाईन वर्कर, त्यानंतर 45 वर्षांवरील नागरिक व आता 18 ते 45 वयोगाटील नागरिकांच्या देखील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या पाच महिन्यांच्या काळात विदर्भात सर्वात कमी कोरोना लसींची नासाडी गोंदिया जिल्ह्यात झाली आहे. तर सर्वाधिक नासाडी ही गडचिरोली जिल्ह्यात झाली आहे.

गोंदियात कोरोना लस वाया जाण्याचे प्रमाण सर्वात कमी
गोंदियात कोरोना लस वाया जाण्याचे प्रमाण सर्वात कमी

By

Published : May 25, 2021, 6:58 PM IST

Updated : May 25, 2021, 7:30 PM IST

गोंदिया -देशात गेल्या वर्षीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. शासनाने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात केली आहे. सुरुवातीला वैद्यकीय कर्मचारी आणी फ्रंटलाईन वर्कर, त्यानंतर 45 वर्षांवरील नागरिक व आता 18 ते 45 वयोगाटील नागरिकांच्या देखील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या पाच महिन्यांच्या काळात विदर्भात सर्वात कमी कोरोना लसींची नासाडी गोंदिया जिल्ह्यात झाली आहे. तर सर्वाधिक नासाडी ही गडचिरोली जिल्ह्यात झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात लस वाया जाण्याचे प्रमाण केवळ 0.8 टक्के आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात हेच प्रमाण 5.95 एवढे प्रचंड आहे. आरोग्य विभागाच्या अहवालामधून ही माहिती समोर आली आहे.

गोंदिया जिल्ह्यात कोरोना लसीची सर्वात कमी नासाडी

जिल्ह्यात केवळ 0.8 टक्के लसींची नासाडी

16 जानेवारीपासून गोंदिया जिल्ह्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर वृद्ध व्यक्ती व 45 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्याला आतापर्यंत 2 लाख 51 हजार 160 लसी प्राप्त झाल्या असून, त्यातून 2 लाख 31 हजार 247 नागरीकांचे लसीकरण करण्यात आले आहे. सध्या आरोग्य विभागाकडे 14 हजार लसी शिल्लक आहेत. विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये लस वाया जाण्याचे सर्वात कमी प्रमाण हे गोंदियामध्ये आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी दिली आहे.

जिल्हेलस वाया जाण्याची टक्केवारी
गोंदिया - 0.8
भंडारा - 0.75
गडचिरोली - 5.95
चंद्रपूर- - 0.19
वर्धा - 0.90
यवतमाळ - 0.90
अमरावती - 0.45
बुडढाणा - 1.55
अकोला - 0.34
वाशीम - 5.54
नागपूर - 0.97

हेही वाचा -बार्ज 'पी305' दुर्घटना : ७१ मृतदेह सापडले; शोधकार्य अजूनही सुरुच

Last Updated : May 25, 2021, 7:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details