गोंदिया -शहर पोलीस ठाण्यांतर्गत गणेशनगर भागात छापा टाकून केरोसीन सदृश्य ज्वलनशील पदार्थ जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांनी केली. अदित्य अग्रवाल (वय.४६) असे छापा टाकण्यात आलेल्या घर मालकाचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने पकडला गणेशनगरात 1900 लीटर ज्वलनशील पदार्थ - Godia Crime News
शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गणेशनगर भागात केरोसीन सदृश्य ज्वलनशील पदार्थ जप्त करण्यात आला. 9 ड्रममध्ये 1900 लीटर केरोसीन सदृश्य ज्वलनशील पदार्थ असल्याची माहिती समजते आहे.
शहर पोलिस ठाणेअतंर्गत येणाऱ्या गणेशनगर भागातील आदित्य अग्रवाल (46. वर्ष, रा. गणेशनगर) यांच्या घरी केरोसीन सदृश्य ज्वलनशिल पदार्थ असल्याची गुप्त माहिती पोलिस अधिक्षकांना मिळाली. माहिती पोलीस अधीक्षकांना मिळताच स्थानिक गुन्हे शाखेसह शहर पोलिसांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार आज 18 एप्रिलला दुपारी 1 च्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे सह.पोलिस निरिक्षक रमेश गर्जे व शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वातील पथकाने छापा घालून कारवाई केली.
आदित्य देवनारायण अग्रवाल यांच्याघरासमोर असलेल्या 9 ड्रममध्ये 1900 लीटर केरोसीन सदृश्य ज्वलनशील पदार्थ आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. आदित्य अग्रवाल यांना संबधित पदार्थाबद्दल विचारणा केली असता त्यांनी कुठलेही सकारात्मक उत्तर दिले नाही. यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी यांना माहिती देत कारवाई करण्यात आली.