गोंदिया - सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड या गावात लॉकडाऊन सुरू असतानाही बेकायदेशीररित्या दारू विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. देशीसह विदेशी दारूचा 2 लाखांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.
संचारबंदीतही गोंदियामध्ये दारू विक्री; 2 लाखांचा माल जप्त
कोरोनाचा प्रसार रोखण्याकरिता संपूर्ण देशात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे कोणीही घराबाहेर पडून नये असे आवाहन केले जात आहे. तसेच अत्यावश्यक वस्तुची दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत.
कोरोनाचा प्रसार रोखण्याकरिता संपूर्ण देशात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे कोणीही घराबाहेर पडून नये असे, आवाहन केले जात आहे. तसेच अत्यावश्यक वस्तुची दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत. मात्र, सौंदड या गावात मद्य दुकाने चालूच होती. दारू विकणाऱ्यांची माहिती गोंदिया पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी देवरी पोलिसांना संपर्क करून त्या ठिकाणी पाठवले. अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या ठिकाणी छापा टाकत तब्बल २ लाखांहून अधिक रुपयाचे देशी व विदेशी मद्य जप्त करण्यात आले आहे.
ड्रममध्ये दारू लपवून ठेवल्याची माहिती समोर आली आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार दारू दुप्पट ते तिप्पट भावाने विकण्यात येत होती. सदर प्रकरणी दोन आरोपीस अटक करण्यात आली असून, एकूण २ लाख ४२ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.