महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'अवैध होर्डिंग्सवर गोंदियात वाहतूक विभागाचा हातोडा' - illegal hordings and banner gondia latest news

शहरात अवैधरित्या लावलेल्या होर्डिंगवर वाहतूक विभाग आणि नगरपरिषद परवाना विभागाने संयुक्तरित्या कारवाई मोहिम हाती घेतली आहे. शहरातील ठिकठिकाणी पुलावर इलेक्ट्रिक पोलवर अत्यंत धोकादायक स्थितीत असलेले होर्डिंग काढण्यात आल्या आहेत.

llegal banner and hordings are removed by city police in gondia
गोंदियात अवैध होर्डिंगवर वाहतूक विभागाचा हातोडा

By

Published : Jan 18, 2020, 9:49 PM IST

गोंदिया -शहरातील अनेक रस्त्यांवर आजूबाजूला होर्डिंग आणि बॅनर लावलेले असतात. यात अनेक ठिकाणी लागलेल्या होर्डिंग्सच्या ठिकाणी अपघात होतात. म्हणून वाहतूक विभागाने अशा अवैध ठिकाणी लावण्यात आलेल्या होर्डिंग आणि बॅनरला हातोडा चालवण्याची मोहीम हाती घेतली आहे.

'गोंदियात अवैध होर्डिंगवर वाहतूक विभागाचा हातोडा'

शहरात अवैधरित्या लावलेल्या होर्डिंगवर वाहतूक विभाग आणि नगरपरिषद परवाना विभागाने संयुक्तरित्या कारवाई मोहीम हाती घेतली आहे. शहरातील ठिकठिकाणी पुलावर इलेक्ट्रिक पोलवर अत्यंत धोकादायक स्थितीत असलेले होर्डिंग काढण्यात आलेत. अवैध होर्डिंगमुळे वाहन धारकांना अनेक समस्यांच्या सामना करावा लागत आहे. शिवाय दुभाजकावर रस्त्यावर तसेच चौका-चौकामध्ये लावलेल्या होर्डिंग्समुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा -पप्पा परत या..! वडिलांच्या निधनानंतर मुलाची निबंधामधून आर्त हाक

याधीही अपघात झाले आहेत. यामुळे वाहतूक विभागाने अवैध काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईत जवळ-जवळ शेकडोच्यावर होर्डिंग्स काढण्यात आले आहेत. तसेच संबंधित व्यक्तींकडून नगरपरिषद अंतर्गत दंड वसूल करण्यात आला आहे. शिवाय परत अवैध होर्डिंग्स लावल्यास त्या व्यक्तीवर गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details