महाराष्ट्र

maharashtra

गोंदियाच्या मुख्य चौकांमध्ये लागणार थकीत कर दात्यांची यादी

By

Published : Jan 7, 2021, 7:08 PM IST

आपल्या दुकानाला टाळे तर लागणार नाही ना, या भीतीने अनेक वर्षांपासून थकीत कर असणाऱ्या दुकानदारांनी कर जमा केला आहे. परिणामी केवळ डिसेंबर महिन्यातच १.२८ कोटी रुपयाच्या कराची वसुली झाली आहे. शासकीय कार्यालयानंतर आता खासगी कार्यालयांकडून कर वसुली करण्याची मोहीम नगर परिषद प्रशासनाने सुरू केली आहे.

गोंदिया
गोंदिया

गोंदिया- नगर परिषद प्रशासनाने कोट्यवधी रुपयांच्या थकीत कर वसुलीसाठी कडक पाउले उचलली आहेत. आता शहरातील मुख्य चौका-चौकांमध्ये थकीत करदात्यांची यादी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी गोंदिया नगर परिषद प्रशासनाने कर वसुलीसाठी १० डिसेंबरपासून विशेष मोहीम सुरू केली आहे. त्यामध्ये संबंधित कर थकीतदारांना नोटीस दिल्यानंतर देण्यात आलेल्या कालावधीत कर जमा न केल्यास अनेक शासकीय कार्यालयांना टाळे ठोकल्याने एकच खळबळ उडाली आहे.

गोंदिया

आपल्या दुकानाला टाळे तर लागणार नाही ना, या भीतीने अनेक वर्षांपासून थकीत कर असणाऱ्या दुकानदारांनी कर जमा केला आहे. परिणामी केवळ डिसेंबर महिन्यातच १.२८ कोटी रुपयाच्या कराची वसुली झाली आहे. शासकीय कार्यालयानंतर आता खासगी कार्यालयांकडून कर वसुली करण्याची मोहीम नगर परिषद प्रशासनाने सुरू केली आहे. थकीतदारांना नोटीस बजावून चार दिवसांच्या अल्टिमेटसह कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

धडक कारवाईने थकीत कराची युध्दपातळीवर वसुली

आता थकीतदारांची यादी शहरातील चौकात लावण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे. या धडक कारवाईने थकीत कराची युध्दपातळीवर वसुली करण्यात येत आहे. यासंदर्भात उपमुख्य अधिकारी तथा कर वसुली अधिकारी विशाल बनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार थकीत व चालू कर असे एकूण ११ कोटी रुपयांच्या कर वसुलीचे लक्ष्य देण्यात आले आहे. यात आतापर्यंत १.२८ कोटी रुपये वसूल झाले आहेत. मार्चपर्यंत जवळपास १०० टक्के विक्रमी वसुलीचे लक्ष ठरविण्यात आले आहे.

विक्रमी वसुली

एप्रिल ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत आठ महिन्यात केवळ १.३५ कोटी रुपये वसूल झाले होते. धडक कावाईने केवळ डिसेंबर महिन्यात १.२८ कोटी इतकी विक्रमी वसुली झाली आहे. पालिका प्रशासनाच्या या विशेष मोहिमेने गत अनेक वर्षांपासूनचे थकीत कर होता, तो आता वसूल होत आहे. म्हणून शासकीय कार्यालयांनंतर आता खासगी कर वसुलीवर भर देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. शासनाला पाठविणार निधी पालिका प्रशासनाने विशेष मोहिमेंतर्गत विक्रमी कर वसुली केली आहे. यात जवळपास ४३ लाख रुपये कल्याण निधीच्या स्वरुपात शासनाला पाठविण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details