गोंदिया - वन विभागातील वनपरिक्षेत्र गोरेगाव येथे येणाऱ्या मुंडीपार बिट अंतर्गत गराडा गावानजीक असलेल्या कक्ष क्रमांक ४३९ संरक्षित वन येथे एक बिबट्याचा मृत्यू झाला. लक्ष्मणराव चंद्रीकापुरे यांच्या मालकीच्या शेतजमिनीत लावलेल्या तारांच्या कुंपणात आज शनिवारी सकाळी 8 वाजताच्या दरम्यान बिबट्याचा फास लागून मृत झाला. ही घटना प्राथमिक तपासात समोर आली. घटनेचा तपास सहायक वनसंरक्षक आर. आर. सतगीर, वनपरीक्षेत्राधिकारी प्रवीण साठवणे यांनी केला आहे.
गोंदियामध्ये तारांच्या कुंपणात फास लागल्याने बिबट्याचा मृत्यू - गोंदिया वनविभाग
गोरेगाव तालुक्यातील गराडा गावाजवळील जंगल परिसरात असलेल्या लक्ष्मणराव चंद्रिकापुरे यांच्या शिवारात वन्य प्राण्यांपासून संरक्षण होण्यासाठी शेताच्या भोवती तारांचे कुंपण लावले होते. या तारांच्या कुंपणात एक बिबट्या फास लागून मृतावस्थेत आढळून आला आहे.
गोरेगाव तालुक्यातील गराडा गावाजवळील जंगल परिसरात असलेल्या लक्ष्मणराव चंद्रिकापुरे यांच्या शिवारात वन्य प्राण्यांपासून संरक्षण होण्यासाठी शेताच्या भोवती तारांचे कुंपण लावले होते. या तारांच्या कुंपणात एक बिबट्या फास लागून मृतावस्थेत आढळून आला आहे. या मृत बिबट्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी यांना देण्यात आली. त्यानंतर ते वनविभागासोबत घटनास्थळी पशु वैद्यकीय अधिकारी दाखल झाले. मृत बिबट्याचे त्या ठिकाणी शवविच्छेदन केले. तर बिबट्याचे सर्व अवयव व्यवस्थित असल्याचे दिसून आले. बिबट्याचा दफनविधी मुरदोली येथील वन परिसरात राष्ट्रीय व्याघ्र येथे करण्यात आला. तर पुढील तपास वनविभाग करीत आहे.