गोंदिया - नाशकातून काही मजुरांनी सुरुवातीला पायी चालत गाव गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र, थकल्यानंतर त्यांनी जवळ असलेल्या पैशांतून सायकल विकत घेतल्या आणि उन्हाचा झळा सहन करत ८०० किलोमीटर प्रवास करत आपले गाव गाठले. हे मजूर गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथील रहिवासी आहेत.
मजुरांनी सुरुवातीला पायी अन् नंतर सायकलने ८०० किलोमीटर प्रवास करत गाठले गाव - गोंदिया लेटेस्ट न्युज
सालेकसा येथील काही मजूर कामासाठी नाशिकला गेले होते. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाले आणि सर्वजण तिथेच अडकले. कामधंदा नसल्याने खायचे काय? असाही प्रश्न त्यांच्यासमोर होता. आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली.
सालेकसा येथील काही मजूर कामासाठी नाशिकला गेले होते. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाले आणि सर्वजण तिथेच अडकले. कामधंदा नसल्याने खायचे काय? असाही प्रश्न त्यांच्यासमोर होता. आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली. मात्र, प्रवासासाठी वाहतुकीची साधने उपलब्ध नव्हती. सरकार देखील घरी पोहोचवायला उशिर करत होते. त्यामुळे या मजुरांनी पायीच प्रवास सुरू केला. मनमाडपर्यंत पायी चालल्यानंतर त्यांनी सायकल खरेदी केल्या. त्यानंतर रात्रंदिवस, उन्हाच्या झळा सहन करत, कधी उपाशीपोटी त्यांनी प्रवास केला. शेवटी ८०० किलोमीटर अंतर कापून सालेकसा येथील आपल्या घरी पोहोचले. त्याचा आनंदही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.