महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आदिवासी समाजाचे उगमस्थान असलेल्या 'कचारगड' यात्रेला सुरुवात

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात आदिवासी बांधवाचे पवित्र श्रद्धा स्थान मानल्या जाणाऱ्या कचारगडची यात्रा सुरू झाली आहे. अत्यंत दुर्गम आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या याठिकाणी ही यात्रा 5 दिवस भरते. याच कचारगडच्या गुहेतूनच आदिवासी बांधवचा उगम झाला, अशी आख्यायिका सांगितली जाते. कचारगड येथे दोन नैसर्गिक गुफा आहेत.

gondia
आदिवासी समाजाचे उगमस्थान असलेल्या कचारगड यात्रेला सुरवात

By

Published : Feb 9, 2020, 9:40 AM IST

गोंदिया -आदिवासी समाजाचे उगम स्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच आशिया खंडातील सर्वात मोठी गुहेच्या स्थानावरील यात्रेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील नक्षलग्रस्थ भागातल्या सालेकसा तालुक्यात कचारगड येथे दरवर्षी ही यात्रा कोयापुणेम पौर्णिमेला भरते. या यात्रेसाठी भारतातील तब्बल 18 राज्यातून आदिवासी बांधव एकत्रित येतात. गेल्या अनेक वर्षांपासून भाविक या ठिकाणी आपली संस्कृती जपत आहेत.

आदिवासी समाजाचे उगमस्थान असलेल्या कचारगड यात्रेला सुरवात

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात आदिवासी बांधवाचे पवित्र श्रद्धा स्थान मानल्या जाणाऱ्या कचारगडची यात्रा सुरू झाली आहे. अत्यंत दुर्गम आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या याठिकाणी ही यात्रा 5 दिवस भरते. याच कचारगडच्या गुहेतूनच आदिवासी बांधवचा उगम झाला, अशी आख्यायिका सांगितली जाते. कचारगड येथे दोन नैसर्गिक गुफा आहेत. त्या आशिया खंडातील सगळ्यात मोठ्या गुफा असल्याचे म्हटले जाते. जवळपास 5 हजार लोक या गुहेतच एकाच वेळेस एकत्र दर्शन घेऊ शकतात.

आदिवासी बांधव दरवर्षी कोयापुणेम पौर्णिमेला याठिकाणी येऊन आपल्या आराध्य देवतेचे दर्शन घेतात. लाखोंच्या संख्येने आदिवासी बांधव या ठिकाणी उपस्थित होऊन आपली संस्कृती जोपासतात. या यात्रेसाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छतीसगड, आंध्र प्रदेश, बिहार, ओरिसा, झारखंड, उतर प्रदेश, मिझोरम या राज्यातून लाखो भाविक येतात. आपल्या आराध्य देवतेचे म्हणजे 'पारी कोपार लींगो' चे दर्शन घेतात. त्याच प्रमाणे विविध राज्यातील विभिन्न आदिवासी बांधव आपाआपल्या राज्यातील नृत्य देखील या कोयापुणेम यात्रेत सादर करतात.

हा भाग नक्षलग्रस्त असून घनदाट जंगल असल्याने या ठिकाणी लाखोंच्या संख्येने आदिवासींसह गैर आदीवासी बांधवही मोठ्या प्रमाण येतात. त्यामुळे पोलीस प्रशासनाचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात येतो. 5 दिवस चालणाऱ्या यात्रेदरम्यान कोयापुनम अधिवेशन देखील आयोजित करण्यात येते. या अधिवेशना दरम्यान आदिवासींची संस्कृती, परंपरा, बोलीभाषा रितीरिवाज, नृत्यकला यांचे प्रदर्शन देखील करण्यात येते. या यात्रेत आदिवासी बांधव रोटी-बेटीचा व्यवहार सुद्धा करीत असतात.

आदिवासी बांधव आतुरतेन कोयापुणेम पौर्णिमेची वाट पाहत असतात. आदिवासींचे आराध्य देवतांचे वास्तव्य नैसर्गिक स्थळात असल्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला नवीन उर्जा मिळते. तसेच या ठिकाणाचे नैसर्गिक सौंदर्य, गुफा पाहण्यासाठी गैर आदिवासी बांधवही मोठ्या प्रमाणावर आपली उपस्थिती दर्शवतात. दरवर्षी येथे येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

स्थानिक प्रशासनाने या ठिकाणी यात्रे दरम्यान होणारी अफाट गर्दी पाहता गेल्या काही वर्षात योग्य त्या त्या सोयी सुविधा केल्या असल्यामुळे या ठिकाणी आत भाविकांना येणे सोयीस्कर झाले आहे. यात्रे दरम्यान जय सेवा जय गोंडवाना चा गजर करीत आदिवासी बाधव कचारगड सर करतात. अगदी पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत या ठिकाणाचे रस्ते भाविकांच्या गर्दीमुळे फुलून जातात. आदिवासी समाज हा विकासापासून आजही वंचित आहे. मात्र, या कचरागड यात्रेचे औचित्य साधून इतर राज्यातील आदिवासी एकत्रित येऊन या ठिकाणी भेट देतात.

ABOUT THE AUTHOR

...view details