महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कचारगड यात्रा रद्द; ३६ वर्षांची पूजेची परंपरा मात्र अखंडच

सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने या वर्षीची कचारगड यात्रा प्रशासनाने रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर केवळ धार्मिक पूजा अर्चा करण्याचा निर्णय मंदिर समितीकडून घेण्यात आला. यासाठी कोरोनाच्या अटी व शर्तींचे पालन करत मोजक्याच लोकांना या पूजेमध्ये सहभागी करून घेत यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे.

kachargad cave yatra
कचारगड यात्रा रद्द

By

Published : Feb 28, 2021, 7:51 AM IST


गोंदिया- दरवर्षी माघ पोर्णिमेला पाच दिवस चालणारी 'कोया पोर्णिमेची' कचारगड यात्रा यंदा कोरोना संकटामुळे रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यामुळे मागील ३६ वर्षांपासून अविरत चालणाऱ्या कचारगड यात्रेत यंदा मात्र थोडा बदल झाला आहे. यात्रेची परंपरा खंडित न करता कमी लोकांच्या उपस्थितीत पूजा अर्चना करत या यात्रेला प्रारंभा झाला आहे.

कचारगड गुहा मंदिर

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात येथे आदिवासी बांधवाचे पवित्र श्रद्धास्थान असलेली कचारगड यात्रेची सुरुवात झाली आहे. मागील ३६ वर्षा पासून सुरू असलेल्या या कचारगड यात्रेला महाराष्ट्रासह परराज्यातील आदिवासी बांधव लाखोंच्या संख्येने आपल्या कुलदेवतेची पूजा व दर्शनासाठी हजेरी लावतात. मात्र, सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने या वर्षीची कचारगड यात्रा प्रशासनाने रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर केवळ धार्मिक पूजा अर्चा करण्याचा निर्णय मंदिर समितीकडून घेण्यात आला. यासाठी कोरोनाच्या अटी व शर्तींचे पालन करत मोजक्याच लोकांना या पूजेमध्ये सहभागी करून घेत यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावाने कचारगड यात्रा रद्द

आशिया खंडातील सर्वात मोठी गुहा

अत्यंत दुर्गम व निसर्गाचा सानिध्यात असलेल्या कचारगड या ठिकाणीची ही यात्रा ५ दिवस चालते. कचारगडच्या गुफेतूनच आदिवासी बांधवचा उगम झाला अशी आख्यायिका आणि इतिहास असल्याचे बोलले जाते. कचारगडामध्ये असलेली गुहा ही निसर्गनिर्मित आहे. आशिया खंडातील सगळ्यात मोठी गुहा असल्याचे येथील नागरिक सांगतात. तसेच या गुहेत जवळपास ५ हजार भाविक एकाच वेळेस दर्शन घेऊ शकतात, इतकी जागा या गुहेत उपलब्ध आहे.

कचारगड यात्रा

आदिवासी बांधव दरवर्षी कोया पौर्णिमेला या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या आराध्य देवतेचे दर्शन घेत असतात. यावेळी आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचे दर्शन पाहायला मिळते. या यात्रेकरिता महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छतीसगड, आंध्र प्रदेश, बिहार, ओरिसा, झारखंड, उतर प्रदेश, मिझोरम, अशा एकूण १६ राज्यातून लाखो आदिवासी भाविकांची गर्दी या ठिकाणी होत असते.

कचारगडच्या गुहेत आदिवासींचे आराध्य दैवत म्हणजे "पारी कोपार लिंगो" ची मूर्ती आहे. या दैवताचे दर्शन घेण्यासाठी आपल्या संस्कृतीमधील परंपरा कायम राखत आदिवासी बांधव मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी उपस्थिती लावतात. त्याच प्रमाणे हे विविध राज्यातील विभिन्न आदिवासी बांधव या यात्रेवेळी आपआपल्या राज्याच्या पंरपरेनुसार आदिवासी नृत्याचे सादरीकरण करतात, त्यामुळे संस्कृतीचा अभ्यासकांसाठी ही यात्रा एक प्रकराची पर्वणीच ठरते. या आदिवासी बांधवाच्या यात्रेदरम्यान आदिवासी समाजातील रोटीबेटीचे व्यवहारही मोठ्या प्रमाणात होत असतात, त्यामुळे या यात्रेला अतिशय महत्व प्राप्त होते.

कोरोनाचा कहर आणि सुरक्षा

कचारगड हा परिसर नक्षलग्रस्त भागात मोडतो. त्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या गर्दीच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून मोठ्या प्रमाणात पोलीस बळ तैनात करण्यात येते. यंदा मात्र राज्यावर कोरोनाचे संकट घोगावत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून यंदाची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यात्रेच्या पंरपरेत खंड पडू नये म्हणून मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत कोरोना नियमांचे पालन करत पूजा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. घरातूनच प

ABOUT THE AUTHOR

...view details