महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जेसीआई गोंदिया राईस सिटीकडून कामगारांना ताक, दुपट्ट्याचे वाटप - gondiya news

गोंदियात 'जेसीआय गोंदिया राईस सिटी'कडून शहरातील कामगारांना ताक आणि उन्हापासून बचावासाठी दुपट्ट्याचे वाटप करण्यात आले. दुपट्याचा मास्क सारखाही उपयोग करता येणार आहे.

गोंदिया
गोंदिया

By

Published : May 1, 2020, 6:39 PM IST

Updated : May 1, 2020, 8:27 PM IST

गोंदिया - आज १ मे महाराष्ट्र दिनासह कामगारदिन असून या दिनाचे औचित्य साधून गोंदियात 'जेसीआय गोंदिया राईस सिटी'कडून शहरातील कामगारांना ताक आणि उन्हापासून बचावासाठी दुपट्ट्याचे वाटप करण्यात आले. दुपट्याचा मास्क सारखाही उपयोग करता येणार आहे.

गोंदिया

कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरू आहे. मात्र, या लॉकडाऊनमुळे संपूर्ण कामे बंद असली तरी हातावर पोट असणारे कामगार संचारबंदीत जे व्यवसाय सुरू आहेत, तेथे कामावर जावून भर उन्हात काम करीत आहेत. लॉकडाऊनमध्ये त्यांना काही हातभार लावावा म्हणून जेसीआय गोंदिया राईस सिटीने कामगारदिनी अशा कामगारांना दुपट्याचे वाटप केले. त्याचा वापर मास्क म्हणून कसा करावा याची माहिती दिली.

Last Updated : May 1, 2020, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details