गोंदिया - जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यात कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने आवश्यक दक्षता घेण्यासाठी सालेकसा येथील शहरवासियांनी कंबर कसली आहे. स्वत: आठवड्यातून 3 दिवस जनता कर्फ्यू लावण्याच्या निर्णय व्यापारी संघ व नागरिकांनी घेतला आहे. आता सालेकसा तालुक्यात 4 दिवस दुकाने सकाळी 9 ते 5 सुरू राहणार आहेत.
सालेकसा तालुक्यात आठवड्यातून 3 दिवस जनता कर्फ्यू; कोरोनाबाधित आढळल्याने नागरिकांनी घेतली खबरदारी - गोंदिया जनता कर्फ्यू
स्वत: आठवड्यातून 3 दिवस जनता कर्फ्यू लावण्याच्या निर्णय व्यापारी संघ व नागरिकांनी घेतला आहे. आता सालेकसा तालुक्यात 4 दिवस दुकाने सकाळी 9 ते 5 सुरू राहणार आहेत.
सालेकसा तालुक्यात आठवड्यातून 3 दिवस जनता कर्फ्यू; कोरोनाबाधित आढळल्याने नागरिकांनी घेतली खबरदारी
तसेच आठवड्यातून शनिवार, रविवार, सोमवार ह्या 3 दिवशी मेडिकल स्टोअर, भाजी दुकाने आणि गॅस वितरक वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. विशेष म्हणजे 15 जूनपर्यंत हा प्रयोग केला जाणार असून परिस्थिती बघून पुन्हा ह्या निर्णयावर चर्चा करून जनता कर्फ्यू वाढविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची रुग्णांची संख्या 44 वर गेली असून 1 रुग्ण याआधी कोरोनामुक्त झाला असून 43 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.