गोंदिया -जिल्ह्यात २०२० वर्ष सुरू होताच पहिल्या दिवशी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली होती. आज पुन्हा दुसऱ्या दिवशीही सकाळी १० वाजल्या पासून पावसाला सुरुवात झाली आहे. तर या पावसामुळे थंडीची चाहूलही वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी शेकोटीचा आधार घेतला आहे. तर हवामान खात्याने येत्या २४ तासात गारपीट व पाऊस पडण्याचे संकेत दिले आहेत.
नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशीही गोंदियात मुसळधार पाऊस, २४ तासात गारपीटीचे संकेत - २४ तासात गारपीट व पावसाचे संकेत
मागील वर्षा पासून डिसेंबर महिन्यात जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. थंडीची चाहूल ही जाणवत असून धुक्याचाही प्रभाव जाणवत होता. येत्या २४ तासात हवामान खात्याने गारपीट व पाऊस पडण्याचे संकेत दिले आहेत. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने आपली दमदार हजेरी लावलेली होती.
मागील वर्षा पासून डिसेंबर महिन्यात जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. थंडीची चाहूल ही जाणवत असून धुक्याचाही प्रभाव जाणवत होता. येत्या २४ तासात हवामान खात्याने गारपीट व पाऊस पडण्याचे संकेत दिले आहेत. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने आपली दमदार हजेरी लावलेली होती. त्यानतंर नवीन वर्ष सुरू होताच पावसाने पुन्हा हजेरी लावली असुन शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या तूर पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. मात्र, या बदलत्या वातावरणाचा परिणाम मानवी जीवनावर होणार आहे.
या अवकाळी पावसामुळे वातावरण बदलले असून नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण दिसू लागले आहे. जिल्ह्यातील खरिपानंतर शेतकरी शेतात लाख, लाखोरी, उडीद, मुग, वाटाणा, हरभरा, जवस, करडई, तूर, भुईमुग यासह अन्य कडधान्ययुक्त पिकांची लागवड करतात. यातही तूर पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. पिके सध्या फुलोऱ्यावर आहेत. अशातच पाऊस पडल्याने फुलोरा गळून पडला आहे. त्यामुळे साहजिकच उत्पादनात घट होणार आहे.