गोंदिया- २६ आणि २७ ऑक्टोबरला झालेल्या अवकाळी पावसामुळे गोंदिया जिल्ह्यात देखील हलक्या वाणाच्या धानाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे गोंदिया विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी गोंदिया विधानसभा क्षेत्रात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या धान पिकांची पाहणी केली. त्याचबरोबर, त्यांनी लवकरात लवकर पंचनामे करून योग्य मोबदला देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
दरवर्षी दिवाळीआधी हलक्या प्रजातीचा धान कापनीला येतो. दिवाळी आनंदात साजरी करता यावी यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात हलक्या धानाची लागवड करतात. मात्र, हलक्या धानाची कापणी झाली असताना अचानकन अवकाळी पावसाने हजेरी लावली. कापून ठेवलेल्या धानाला शेतातच पुन्हा अंकुर आले. तर, भारी प्रजातीचा धान कापनीला असताना तो अवकाळी पावसामुळे खाली पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दिवाळीच्या तोंडावर आस्मानी संकट कोसळले आहे.