महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रजननक्षम महिलांमध्ये अ‍ॅनिमियाचे वाढते प्रमाण; गोंदियातील ८० टक्के महिला अ‍ॅनिमियाच्या विळख्यात

गोंदिया जिल्ह्यातील प्रजननक्षम महिलांमध्ये अ‍ॅनिमियाचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. गोंदिया येथील बाई गंगाबाई महिला रूग्णालयात महिनाभरात तपासणीसाठी येणा-या ४५०० ते ४८०० महिलांपैकी २ हजार ते २ हजार २२५ महिलांमध्ये रक्ताचे प्रमाण अत्यल्प असल्याचे आढळून आले. या बाबीला रूग्णालय प्रशासनाने दुजोरा दिला आहे.

प्रजननक्षम महिलांमध्ये अ‍ॅनिमियाचे वाढते प्रमाण; गोंदियातील ८० टक्के महिला अ‍ॅनिमियाच्या विळख्यात

By

Published : Aug 24, 2019, 11:47 PM IST

गोंदिया - गोंदिया हा आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात प्रजननक्षम महिलांमध्ये अ‍ॅनिमियाचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे.

प्रजननक्षम महिलांमध्ये अ‍ॅनिमियाचे वाढते प्रमाण; गोंदियातील ८० टक्के महिला अ‍ॅनिमियाच्या विळख्यात
गोंदिया येथील बाई गंगाबाई महिला रूग्णालयात महिनाभरात तपासणीसाठी येणा-या ४५०० ते ४८०० महिलांपैकी २ हजार ते २ हजार २२५ महिलांमध्ये रक्ताचे प्रमाण अत्यल्प असल्याचे आढळून आले. या बाबीला रूग्णालय प्रशासनाने दुजोरा दिला आहे. वपोषण आहाराची कमरतता, अवेळी लादलेले मातृत्व यामुळे हा आजार फोफावत असल्याचे बोलले जाते. जिल्ह्यातील दुर्गम भाग समजले जाणारे सालेकसा, देवरी तालुक्यात आदिवासी समाज बांधवांची संख्या अधिक आहे. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या गावांत आजही जुन्या रूढी, परंपरा कायम आहेत.अतिदुर्गम भागात शासकिय यंत्रणा पोहचत नसल्याने तेथील रहिवाशांमध्ये जनजागृतीचा अभाव आहे. काय खावे, काय खाऊ नये, कोणत्या वयोगटात लग्न करावे याचे ज्ञान दुर्गम भागातील बहुतांश नागरिकांमध्ये नाही. लहान वयातच मुला-मुलींना संसारात अडकवले जाते. याचाच परिणाम म्हणून कमी वयाच्या प्रजननक्षम महिलांमध्ये अ‍ॅनिमियाचे प्रमाण जास्त आहे.या महिलांमध्ये सिकलसेल, थॅलेसिमिया, मलेरिया, कंबरदुखी, पाठदुखी हे आजारदेखील आढळून येतात. अकाली मातृत्वामुळे कित्येकांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. ८० टक्के प्रजननक्षम महिलांमध्ये हा आजार असल्याने जिल्हावासीयांसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details