गोंदिया-जिल्ह्यात नवीन वर्षात कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्यास, ती सर्व प्रथम जिल्ह्यातील 8 हजार 636 आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांना दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खासगी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नावाची ऑनलाई नोंदनी देखील सुरू झाली आहे.
पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळणार लस
गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार ११७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १२ हजार ६१६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यात 174 जणांचा मृत्यू झाला असून, सध्या 327 जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्यानंतर ती पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्या प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. 8 हजार 636 आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येईल, त्यापैकी ७ हजार ३४७ कर्मचारी हे शासकीय रुग्णालयातील आहेत, तर १ हजार २८९ कर्मचारी हे खासगी रुग्णालयामधील आहेत.
8 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळणार कोरोना प्रतिबंधक लस कोरोना प्रतिबंधक लसीसाठी नोंदनी आवश्यक
कोरोना प्रतिबंधक लस मिळवण्यासाठी सर्वात प्रथम आरोग्य विभागाच्या साईटवर जाऊन नोंदनी करावी लागणार आहे. नोंदनी केलेल्या कर्मचाऱ्यांना ही लस मिळेल, मात्र नोंदनी न केल्यास ही लस मिळणार नाही. तसेच ज्या केंद्रावर ही लस दिली जाणार आहे. त्याठीकाणी एकाच वेळेस 100 पेक्षा अधिक जणांना प्रवेश मिळणार नसल्याचेही आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.