गोंदिया - कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी सर्व प्रकारची वाहतूक व्यवस्था बंद आहे. त्यात रेल्वेचाही समावेश आहे. मात्र, १ जूनपासून काही रेल्वे प्रवासी गाड्या सुरू होत आहेत. त्या अनुषंगाने ऑनलाईन तिकीट विक्री सुरू झाली आहे. या संधीचा लाभ घेत आरोपीने ई-तिकीटचा काळाबाजार करून प्रवाश्यांना तिकीट देताना रेल्वे पोलिसांनी त्या आरोपीला रंगेहात पकडण्यात आले.
रेल्वे आरक्षित तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्याला अटक - gondia illegal railway ticket
रेल्वे पोलिसांनी आरोपीला पकडून त्याच्याकडून ५ नग ई-तिकीट किंमत १० हजार १४४ रूपये, एक लॅपटॉप किंमत १५ हजार रूपये असा एकूण २५ हजार १४४ रूपयांचा मुद्येमाल पोलिसांनी जप्त केला.
१ जूनपासून गोंदिया स्थानकावरून काही ट्रेन जाणार आहेत. याच संधीचा लाभ घेत आयआरसीटीसीचा अधिकृत एजंट नसतानाही आरोपीने ई-तिकीट विक्रीचा गोरखधंदा सुरू केला. ही बाब रेल्वे पोलिसांना माहिती पडताच रेल्वे पोलिसांनी आरोपीला पकडून त्याच्याकडून ५ नग ई-तिकीट किंमत १० हजार १४४ रूपये, एक लॅपटॉप किंमत १५ हजार रूपये असा एकूण २५ हजार १४४ रूपयांचा मुद्येमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपीला रेल्वे सुरक्षा बल क्राईम ब्रॅंच गोंदिया येथे आणून पुढील कारवाईसाठी रेल्वे सुरक्षा बलकडे सुपूर्द करण्यात आले.