गोंदिया- अर्जुनी मोरगाव तालुक्यात मध्यरात्री टाकण्यात आलेल्या छाप्यात चारचाकीतून अवैध दारू जप्त करण्यात आला आहे. यामध्ये देवेंद्र विश्वजीत सरकार (वय-21, रा. गौरनगर तालुका) या तरुणाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर 239/2019 कलम 65ई 77अ 80 मदाका या नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संबंधित दारूसाठा गडचिरोलीत नेत असताना अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी कारवाई केली आहे.
नाकाबंदीत दीड लाखाचा मुद्देमाल जप्त; दारूसाठ्यासह चारचाकी पोलिसांच्या ताब्यात - गोंदियात अवैध दारूसाठा जप्त
अर्जुनी मोरगाव तालुक्यात मध्यरात्री टाकण्यात आलेल्या छाप्यात चारचाकीतून अवैध दारू जप्त करण्यात आला आहे. यामध्ये देवेंद्र विश्वजीत सरकार (वय-21, रा. गौरनगर तालुका) या तरुणाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे.
नाकाबंदीत दीड लाखाचा मुद्देमाल जप्त; दारूसाठ्यासह चारचाकी पोलिसांच्या ताब्यात
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी इटखेडा जवळ नाकाबंदी करुन चारचाकी गाडीला आडवले. नवेगाव बांधकडून वडसाकडे जाणाऱ्या मार्गावर एक पांढऱ्या रंगाची चारचाकी (एमएच35 के 4470) पोलिसांना दिसली. तपासणी केल्यानंतर या गाडीत दारूचे 90 बॉक्स आढळले. जप्त करण्यात आलेल्या मद्याची किंमत 51 हजार रुपये असून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.