गोंदिया -लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - २०१९ मध्ये देशात विविध टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्यात भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात येत्या ११ एप्रिलला मतदान होणार आहे. मतदातांनी आपले मत देऊन लोकशाहीला बळकट करावे तसेच या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार जागृती करण्यासाठी हावडा येथून ८ एप्रिलला प्रारंभ केला आहे.
मतदान जागृती करणाऱ्या हावडा- एक्सप्रेसला जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवला हिरवा झेंडा - railway station
या हावडा - एक्सप्रेसचे ९ एप्रिलला सायंकाळी ५ च्या सुमारास गोंदिया रेल्वे स्थानकावर आगमन झाले असता जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी रेल्वेतील प्रवाशांसोबत संवाद साधून त्यांना गो फॉर वोट हे पॉम्पलेटस दिले.
या हावडा - एक्सप्रेसचे ९ एप्रिलला सायंकाळी ५ च्या सुमारास गोंदिया रेल्वे स्थानकावर आगमन झाले असता जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी रेल्वेतील प्रवाशांसोबत संवाद साधून त्यांना गो फॉर वोट हे पॉम्पलेटस दिले. सर्वांनी या निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असा आग्रह त्यांनी यावेळी केला. रेल्वेतील काही प्रवाशांनी वोटर्स सेल्फी पॉर्इंट समोर उभे राहून सेल्फीसुध्दा काढला. जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी हावडा- एक्सप्रेसचे लोको पायलट एच.डी. मोटघरे यांचे पुष्पगुच्छ व मिठाई देवून स्वागत केले. त्यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.