गोंदिया - जिल्ह्याच्या सडक अर्जुनी येथील नगरपंचायतीच्या वतीने स्थानिक लंजे आश्रम शाळेत सर्व सोयी सुविधायुक्त 'होमली इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन सेंटर' तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आदर्श क्वारंटाइन सेंटर म्हणून गणले जात आहे.
सडक अर्जुनीत सर्व सोई-सुविधायुक्त 'होमली इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन सेंटर'
जिल्ह्याच्या सडक अर्जुनी येथील नगरपंचायतीच्या वतीने स्थानिक लंजे आश्रम शाळेत सर्व सोयी सुविधायुक्त 'होमली इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन सेंटर' तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आदर्श क्वारंटाइन सेंटर म्हणून गणले जात आहे.
सध्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू केले आहे. या काळात बाहेरगावाहून येणारे नागरिक, स्त्री-पुरुष, विद्यार्थी आदींची व्यवस्था सदर सेंटरमध्ये करण्यात आली आहे. सदर केंद्राला 'होमली इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन सेंटर' असे नाव देण्यात आले आहे. या सेंटरमध्ये महिलांसाठी 'ए' झोन व पुरुषांसाठी 'बीʼ झोन अशी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येकांना वेगवेगळ्या बेडची व्यवस्था केली आहे.
लॅट्रीन, बाथरूम, पिण्यासाठी पाणी, कचरापेटी आदी केंद्रातील व्यक्तींना सर्व सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. या परिसरात सी.सी.टी.व्ही. कॅमरे लावले आहेत. वाढती उष्णता लक्षात घेता प्रत्येक रूममध्ये पडदे व कुलरची व्यवस्थाही केली आहे. तसेच, विविध ठिकाणी सूचना फलक लावले आहेत. हा परिसर दररोज सॅनिटाईज करण्यात येत असून नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. विवेक मेश्राम यांच्या कार्याची शहरात प्रशंसा केली जात आहे.