गोंदिया - सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण सध्या गाजत आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देणार की, मुंबई पोलीस करणार, असा प्रश्न माध्यमांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारला. यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुढील कार्यवाही होईल, असे देशमुख यांनी सांगितले.
'सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुढील कार्यवाही' - गृहमंत्री अनिल देशमुख न्यूज
'सुशांत सिंह प्रकरणात सर्वांनी आपापले म्हणणे मांडले आहे. ही प्रतिज्ञापत्रे सर्वोच्च न्यायालयाकडे दिली आहेत. न्यायालयाचा निर्णय पुढील आठवड्यात येणार असून त्यांच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेतला जाईल,' असे देशमुख म्हणाले.

गृहमंत्री देशमुख आज गोंदिया येथे ध्वजारोहणासाठी आले होते. त्यावेळी त्यांना सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाविषयी विचारण्यात आले. यावर बोलताना 'सुशांतसिंह प्रकरणात सर्वांनी आपापले म्हणणे मांडले आहे. ही प्रतिज्ञापत्रे सर्वोच्च न्यायालयाकडे दिली आहेत. न्यायालयाचा निर्णय पुढील आठवड्यात येणार असून त्यांच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेतला जाईल,' असे देशमुख म्हणाले. सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची आम्ही वाट बघत आहोत. जसा निर्णय येईल, त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करू, असे ते म्हणाले.