गोंदिया - दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची सुरक्षा काढणे म्हणजे राजकीय सूड आहे. अनेक मोठी पदे भूषवणाऱ्या शरद पवार यांची सुरक्षा द्वेषापोटी काढण्यात आली असल्याच्या आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. ते जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी गोंदिया आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
'शरद पवार यांची सुरक्षा राजकीय द्वेषापोटी काढण्यात आली' - News about Sharad Pawar
दिल्लीत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची सुरक्षा राजकीय द्वेषापोटी काढण्यात आली, असा अरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. ते जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी गोंदिया येथे आले होते.
तत्कालीन गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी फोन टॅपिंग करण्यात काही हरकत नसल्याच्या विधाना बाबत विचारले असता आपल्याला त्यांच्या वक्तव्याबबत कल्पना नसल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी शरद पवार यांनी भीमा-कोरेगाव प्रकरणी SIT द्वारे चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांना केल्या बाबत विचारले असता भीमा-कोरेगाव प्रकरणी योग्य चौकशी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त काय तयारी आहे, याबाबत विचारणा केली असता देशात सर्वत्र CAA आणि NRC च्या विरोधात मोर्चे निघाले आहेत. या संदर्भात कडेकोट बंदोबस्त केला असून कुठेही अनुचित घटना घडू नये, या संदर्भात आम्ही खबरदारी घेत असल्याची माहिती त्यांनी गोंदियात दिली.