गोंदिया- पुलवामा आणि बालाकोट येथे झालेल्या हल्ल्यांच्या संवेदनशील बाबी अर्णबला कशा कळाल्या. अर्णब गोस्वामीसारख्या पत्रकाराला राष्ट्रीय सुरक्षेची माहिती कशी मिळते? याचा खुलासा केंद्र सरकारने द्यावा, असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.
अर्णब गोस्वामीला राष्ट्रीय सुरक्षेची माहिती मिळते कशी - गृहमंत्री देशमुख
हल्ल्यांच्या संवेदनशील बाबी अर्णबला कशा कळाल्या. अर्णब गोस्वामीसारख्या पत्रकाराला राष्ट्रीय सुरक्षेची माहिती कशी मिळते? याचा खुलासा केंद्र सरकारने द्यावा, असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.
टीआरपी घोटाळा प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामी यांच्यावर सध्या कार्यवाही सुरू आहे. अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थोदास गुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप संभाषण बाहेर आल्यानंतर अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हे व्हायरल झालेले चॅट हे ५०० पानांचे असून अतिशय गंभीर आहे. त्याची सखोल चौकशी करण्यात यावी, अनेक गोष्टी या चॅटमध्ये असल्याचा धक्कादायक अंदाज गृह विभागाने वर्तवला होता. पुलवामा आणि बालाकोट येथे झालेल्या हल्ल्याच्या इतक्या संवेदनशील गोष्टी अर्णबला कशा कळल्या? याचा खुलासा केंद्र सरकारने करावा, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.