गोंदिया- राज्याच्या तिजोरीत किती पैसे शिल्लक आहेत. हे तपासून पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करू. त्याआधी मागील सरकारने साडेसहा हजार रुपये घोषित केले होते. मात्र, तेही दिले नाहीत. त्यामुळे आधी साडेसहा हजारांचे मानधन सुरळीत कसे देता येईल या संदर्भात पाठपुरावा करू असे, आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे.
पोलीस पाटील हा ग्रामीण भागातील महतवाचा दुवा असून याच्या समस्या लवकरच मुबईत बैठक घेऊन लावू असे, आश्वासन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी पोलीस पाटलांना दिले.
अधिवेशनात बोलताना मान्यवर
गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यात पोलीस पाटलांचे विदर्भस्तरीय अधिवेशन पाहिल्यांदाच आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले बोलत होते. त्यांच्यासह अनेक मान्यवरांनी या अधिवेशनात हजेरी लावली होती. सोबतच पूर्व विदर्भातील शेकडो पोलीस पाटील देखील या अधिवेशनात हजर झाले होते. पोलीस पाटील यांच्या समस्या व मागण्यांची वाच्यता या अधिवेशनात करण्यात आली.
हेही वाचा - हिरवळीचे वान, सौभाग्याची शान..! पर्यावरण संरक्षणासाठी गोंदियात '16 श्रृंगार' कार्यक्रम