गोंदिया - गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने वातावरणात ऊन-सावलीचा खेळ सुरू आहे. अशा परिस्थितीत पुन्हा शुक्रवारी जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. आजही जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी दमदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर या पावसामुळे शेतीपिकाचे नुकसान झाले आहे. खरीप पिकाबरोबर रब्बी हंगामही हातातून गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने सुर्यदर्शन दुर्लभ झाले. ढगाळ वातावरण कायम असताना गारवाही सुरू आहे. वातावरणात झालेल्या अचानक बदलाचा फटका लहान मुले, वयोवृध्द व्यक्तींना अधिक बसला आहे. सर्दी, ताप, खोकला अशा आजारांनी डोके वर काढले आहे. शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांत रुग्णांची गर्दी दिसून येत आहे.
हेही वाचा -महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजना 15 एप्रिल पूर्वी पूर्ण करा - मुख्यमंत्री