महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदियात हनुमान जयंती उत्साहात साजरी - hanuman-jayanti-celebration

दरवर्षी प्रमाणे १० हजारच्या वर भाविकांनी महाप्रसाद घेतला. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शहरवासीयांचे आराध्य देवता असलेल्या या मंदिरात भाविकांनी हनुमानाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. यामध्ये महिला भाविकांचादेखील मोठ्या प्रमाणात समावेश होता.

गोंदियात हनुमान जयंती उत्साहात साजरी

By

Published : Apr 20, 2019, 3:16 PM IST

गोंदिया- हनुमान जयंतीनिमित्त अनेक मंदिरात भाविकांनी काल सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. गोंदिया शहरात असलेल्या प्राचीन हनुमान मंदिरसुद्धा सकाळपासून पासून भाविकांच्या उत्साह दिसत होता. शहरातील सिव्हीलाईन परिसरातील असलेलले हे हनुमान मंदिर अतिशय पुरातन असून जवळपास १०० वर्षांहून अधिक जुने आहे.

गोंदियात हनुमान जयंती उत्साहात साजरी

त्याचप्रमाणे गौतम नगरातील लेटलेले हनुमान मंदिरातदेखील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. वर्षभर या ठिकाणी भाविकांची चांगलीच वर्दळ असते. शिवाय जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी विविध अनुष्ठान मंदिर समितीतर्फे ठेवण्यात येतात. यामध्ये मुख्यत सुंदरकांड, भजन, कीर्तन, हनुमान चालीसा यांचा समावेश असल्यामुळे दर दिवशी हजारो भाविक या हनुमान मंदिरात देवापुढे नतमस्तक होतात.

दर शनिवारी व मंगळवारी मंदिरात विशेष पूजेचे आयोजन करण्यात येते. दिवसेंदिवस भाविकांची गर्दी या मंदिरात वाढत चालली आहे. या मंदिरात हनुमान जयंती निमित्त औचित्य साधून मागील तीन दिवसापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काल सकाळी हनुमानाचा अभिषेक करत हनुमानाला ५६ भोग चढवले गेले.
त्यानंतर आरती झाल्यावर भाविक दर्शनासाठी आले होते. तसेच सकाळी ११ वाजेपासून भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे १० हजारच्या वर भाविकांनी महाप्रसाद घेतला. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शहरवासीयांचे आराध्य देवता असलेल्या या मंदिरात भाविकांनी हनुमानाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. यामध्ये महिला भाविकांचादेखील मोठ्या प्रमाणात समावेश होता.

ABOUT THE AUTHOR

...view details