महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गुन्ह्याच्या उद्देशाने अवैध पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक; गोंदियातील स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - Gondia man arrested for illegal weapon

आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलावर मेड इन यूएसए लिहिले आहे. तसेच पिस्तूलमध्ये लागणारे मॅगजीनसुद्धा पोलिसांनी हस्तगत केले आहे. त्याने अवैध पिस्तूल कुठून आणि कोणत्या उद्देशाने आणले, याबाबत चौकशी केली जात आहे. गोंदिया शहरात येणाऱ्या अवैध शस्त्रांबाबत आणि अवैध शस्त्रांकडून नेटवर्कबाबत आरोपीकडे चौकशी केली जात आहे.

Guy arrested for carrying illegal pistol in Gondia
गुन्ह्याच्या उद्देशाने अवैध पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक; गोंदियातील स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

By

Published : Dec 27, 2020, 2:31 AM IST

गोंदिया : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामार्फत अवैध शस्त्रांविरोधात करण्यात येणाऱ्या विशेष कारवाई अंतर्गत एन.एम.डी. कॉलेजजवळ असणाऱ्या प्रेमगलीमध्ये एका तरुणाला अटक करण्यात आली. गुन्हा घडवून आणण्याच्या उद्देशाने अवैध पिस्तूल घेऊन फिरत असल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. आरोपी शोएब नवाब खान (23) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याजवळून पिस्तूल आणि मॅगजीन जप्त करण्यात आले आहे.

गुन्ह्याच्या उद्देशाने अवैध पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक; गोंदियातील स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अवैध शस्त्राबाबत चौकशी सुरू..

आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलावर मेड इन यूएसए लिहिले आहे. तसेच पिस्तूलमध्ये लागणारे मॅगजीनसुद्धा पोलिसांनी हस्तगत केले आहे. त्याने अवैध पिस्तूल कुठून आणि कोणत्या उद्देशाने आणले, याबाबत चौकशी केली जात आहे. गोंदिया शहरात येणाऱ्या अवैध शस्त्रांबाबत आणि अवैध शस्त्रांकडून नेटवर्कबाबत आरोपीकडे चौकशी केली जात आहे. सदर युवक वादविवादाच्या प्रकरणात सक्रिय राहत असल्याची माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे.

खास गुन्हा घडवून आणण्याच्या उद्देशाने फिरत होता युवक..

आरोपीला एक खास गुन्हा घडवून आणायचा होता. याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पेट्रोलिंग करीत असलेल्या पोलिसांच्या चमूने रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या कुडवा नाक्याकडे आपला मोर्चा वळविला. दरम्यान आरोपी युवक टी.बी. टोलीकडे जाण्यार्‍या प्रेमगलीमागच्या रस्त्यावर उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळावी. त्यानंतर पंचपुराव्यांसह पोलिसांनी आपले जाळे पसरवून संशयीत युवकाला पकडून त्याची तपासणी केली. त्यावेळी आरोपीच्या कमरेच्या उजवीकडील भागाच्या पिस्तूल आढळली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

गुन्हा दाखल..

चौकशीत आरोपीने सांगितले की, पिस्तूल बाळगण्यासाठी त्याच्याकडे परवाना नाही. सदर पिस्तुलची किंमत 40 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. या पिस्तुलच्या बॅरलची पूर्ण लंबी 16 सेमी व बॅरल ते मूठपर्यन्तची लांबी 11.7 सेमी आहे. त्याच्या विरुद्ध रामनगर पोलिसांनी भारतीय हत्यारबंदी कायदा अधिनियम 1951 च्या कलम 3, 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोंदिया अवैध हत्यारांचा गड बनत आहे. उत्तर प्रदेशवरून गोंदिया-वाराणशी बरौनी एक्स्प्रेस ट्रेनद्वारे गोंदिया शहरात अवैध हत्यारे मोठ्या प्रमाणात येत असल्याची माहिती आहे.

कारवाई करणारे पथक..

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड, सहायक उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, सहायक फौजदार करपे, पोलीस हवलदार राजू मिश्रा, राजेश बडे, पोलीस नायक मेहर, ठाकरे, शेख, पटले, बिसेन, महिला पोलीस कर्मचारी गेडाम, चालक पांडे, खरवडे आदींनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details