गोंदिया - जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील डाकराम सुकळी देवस्थानात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील २७ जोडपी या सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झाली.
डाकराम सुकळी देवस्थानाचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न; २७ जोडपी विवाहबद्ध - gondia
एकूण २७ जोडपी या कार्यक्रमात विवाहबंधनात अडकली. त्यापैकी १२ जोडप्यांचा बौध्द विवाह पध्दतीने तर १५ जोडप्यांचा हिंदू विवाह पध्दतीने विवाह पार पडला.
वाढत्या महागाईमुळे सामान्य कुटुंबातील लोकांना आपल्या मुला मुलींचे विवाह सोहळे थाटामाटात करणे परवडत नाही. त्यामुळे डाकराम सुकळी देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने मागील १४ वर्षांपासून, सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. या वर्षीदेखील गोंदिया जिल्ह्याच्य ८ तालुक्यांतील २७ जोडपी या निमित्ताने विवाहबंधनात अडकली.
देवस्थानच्या वतीने नवदाम्पत्यांना संसार उपयोगी साहित्य देण्यात आले. या विवाह सोहळ्याचे आयोजक माजी आमदार दिलीप बनसोड, माजी आमदार राजेंद्र जैन यांच्यासह इतर मान्यवरांनी या विवाह सोहळ्याला हजेरी लावत नवदाम्पत्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. सामाजिक सलोखा आणि समाजभान जपाणारे भाविकांचे श्रद्धास्थान, अशी या डाकराम सुकळी देवस्थानाची ओळख आहे