गोंदिया - जिल्याच्या तिरोडा तालुक्यातील नवेझरी गावात गुरूवारी ग्राम मंडळाची निवडणूक घेण्यात आली. महेंद्र भांडारकर यांची अध्यक्ष म्हणून तर प्रभाकर उके यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गोंदियात नवेझरी ग्राम मंडळाची निवडणूक सकाळी ११ वाजता ग्रामसभेला सुरवात झाली होती. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचे दोन गट तयार करण्यात आले होते. दोन्ही गटातील उमेदवारांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी नामांकन दाखल केले होते. यापैकी १७२२ मतदारांपैकी १०१६ मतदारांनी मतदानात भाग घेतला. ज्यामध्ये दोन्ही गटातील पुरुष आणि महिलांनी रांगेत बसत हात वर करत मतदान केले.
महाराष्ट्रात १९ गावांना राज्य सरकारने ग्राम मंडळाचा दर्जा दिला आहे. ज्या लोकांनी गावातील विकासासाठी जास्तीत जास्त स्वतःच्या मालकीचा भूखंड ग्रामपंचातील दान दिले असतात, अशा गावाची ग्राम मंडळासाठी निवड करण्यात येते. विशेष बाब म्हणजे, गावातील जो व्यक्ती ग्राम मंडळाला स्वतःच्या मालकीचा भूखंड दान करतो अशाच व्यक्तीला निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदा करिता उभे राहता येते. आतापर्यंत राज्यात फक्त १९ गावांना ग्राम महामंडळाचा दर्जा देण्यात आला आहे.
जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीकडून ग्राम मंडळ असलेल्या गावांना गावाच्या विकासाकरिता मंजूरी घ्यावी लागत नाही. गावकरी ग्राम मंडळाच्या सभेत बहुमताने ठराव पास करतात. नंतर ग्राम मंडळ तो ठराव सरळ राज्य सरकारला पाठवितात आणि राज्य सरकार त्या कामांना ग्राम मंडळ अधिनियमानुसार मान्यता देते. त्यामुळे गावाच्या विकासात अडथळा निर्माण होत नाही. ग्राम पंचायती मध्ये सरपंच, उपसरपंच नेमला जातो तर ग्राम मंडळात अध्यक्ष, उपाध्यक्ष नेमला जातो. निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार यांनी जबाबदारी पार पाडली. अध्यक्ष म्हणून उभे असलेल्या महेंद्र भांडारकर याना सर्वाधिक १०१६ पैकी ५३८ मते मिळाल्याने निवडणूक अधिकऱ्यांनी भांडारकर यांना अध्यक्ष म्हणून घोषित केले.