महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदियातील पोलीस 'हायटेक' , ई-चालान प्रकल्पांतर्गत २००हून अधिक वाहन चालकांवर कारवाई - sapate

स्मार्टफोनच्या स्मार्ट युगात आता पोलिसही कात टाकून स्मार्ट काम करत आहेत. कॅशलेसच्या स्मार्ट युगात चालानसाठीच्या दंडासाठी कॅशलेसची सोय केली असून स्वाईप मशीनचा (एम- स्वाईप ईलेक्ट्रीक डिव्हाईस) वापर करत आहेत.

स्वाईप मशीनने दंड स्वीकारताना वाहतूूक पोलीस कर्मचारी

By

Published : May 9, 2019, 7:44 PM IST

गोंदिया- स्मार्टफोनच्या स्मार्ट युगात आता पोलिसही कात टाकून स्मार्ट काम करत आहेत. कॅशलेसच्या स्मार्ट युगात चालानसाठीच्या दंडासाठी कॅशलेसची सोय केली असून स्वाईप मशीनचा (एम- स्वाईप ईलेक्ट्रीक डिव्हाईस) वापर करत आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई दरम्यान पारदर्शकता यावी, या उद्येशाने एक राज्य, एक ई-चालान, असे प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी १ मे 'महाराष्ट्र दिन' पासून सुरू झाली आहे.

संजय सिंग, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा


गोंदिया वाहतूक पोलिसांनी २ ते ८ मे पर्यंत राबवलेल्या प्रकल्पांतर्गत २०० हून अधिक वाहन चालकांवर ई-चालान पध्दतीने कारवाई केली आहे. यामध्ये हेल्मेट न वापरणारे, लायसन्स न बाळगणारे व तिघे जण दुचाकीवर वाहून नेणाऱ्या वाहन चालकांचा समावेश आहे. 'एक राज्य, एक ई-चालान' या प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यात १ मेपासून करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडून ४० एम स्वाईप इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस पोलिसांकडे देण्यात आले असून याचे उद्घाटन पोलीस अधिक्षक विनिता साहु यांनी केले. या प्रकल्पाची अंमलबजावणी २ मेपासून सुरू झाली आहे. नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर वाहतूक शाखेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. या दंडासाठी आतापर्यंत फाडण्यात येणारी पावती आता बंद होऊन नियम तोडणाऱ्या वाहनधारकांना थेट ई- चालान देण्यात येणार आहे.


वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर जिल्हा वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात येते. मात्र, कारवाईवेळी अनेकदा वाहनचालक वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यासोबत वाद करतात. त्यात दंड जास्त घेण्यात येत असल्याचा आरोप करतात. रस्त्यावर होणारे हे वाद बऱ्याचदा चर्चेचा विषय ठरतात. हा सर्व प्रकार बंद व्हावा आणि वाहतूक शाखेचा कारभार अधिक पारदर्शी व्हावा यासाठी राज्य शासनाने ही अंमलात आणली आहे. काही जिल्ह्यांमध्ये या प्रणालीव्दारे वाहतूक शाखा स्मार्ट झाल्या आहेत. मात्र, गोंदिया जिल्ह्यात या संदर्भात असलेली अंमलबजावणी खोळंबली होती. दरम्यान जिल्ह्यात नव्या प्रणालीचा अवलंब सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी राज्याच्या गृह विभागाने पत्र वाहतूक शाखेला पाठविले असून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेकडे एम स्वाईप मशीन पुरविण्यात आल्या आहेत. एखाद्या मोबाईलसारखी ही मशीन आहे. इतकेच नव्हेतर त्याला ब्लुटूथशी प्रिंटर अटॅच करण्यात आलेले आहे. त्यात कर्मचाऱ्यांना मशीन वापरण्यासाठी स्वत:चा लॉगइन आयडी आणि पासवर्ड देण्यात आला आहे. त्याची नोंद केल्यानंतरच मशीन वापरता येणार आहे. त्यात वाहनधारकाने केलेल्या गुन्ह्याचे कलम नोंद करताच त्यासाठी ठरवून दिलेल्या दंडाची पावती प्रिंटरमधुन बाहेर येते. ती रक्कम वाहनधारक त्याच ठिकाणी किंवा कार्डच्या माध्यमातून भरू शकणार आहे. तसेच पावती घेउन न्यायालयातही दंड भरता येणार आहे. या पध्दतीमुळे चोरीचे वाहन, चालकाचा परवाना यांची माहितीही तात्काळ मिळणार आाहे. दंडाची रक्कम थेट अप्पर पोलीस महासंचालकाच्या वाहतूक शाखेकडे जमा होणार आहे. तिथून ही रक्कम जिल्हा शाखेच्या खात्यात वळती होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details