महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदिया जिल्हा परिषदेत 'झिरो पेंडन्सी' उपक्रम; मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश खवले यांची संकल्पना - गोंदिया जिल्हा परिषद झिरो पेंडन्सी

शासकीय कार्यालयात एखाद्या कामाची फाईल आली की ती किती दिवसाने पूर्ण होणार हे सांगता येत नाही. यामुळे सामान्य जनतेला अनेकदा जिल्हा परिषदेत चकरा माराव्या लागतात. मात्र, गोंदिया जिल्हा परिषदेत असा प्रकार बघायला मिळणार नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) राजेश खवले यांनी जिल्ह्यात 'झिरो पेंडन्सी' नावाचा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे.

Gondia Zilla Parishad
गोंदिया जिल्हा परिषद

By

Published : Aug 8, 2020, 5:39 PM IST

गोंदिया - जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय समजले जाते. ग्रामीण भागातील नागरिकांची अनेक कामे जिल्हा परिषदेमध्ये असतात. मात्र, अनेकदा 'शासकीय काम अन् सहा महिने थांब' या म्हणी प्रमाणे कामे रखडतात. शासकीय कार्यालयात एखाद्या कामाची फाईल आली की ती किती दिवसाने पूर्ण होणार हे सांगता येत नाही. यामुळे सामान्य जनतेला अनेकदा जिल्हा परिषदेत चकरा माराव्या लागतात. मात्र, गोंदिया जिल्हा परिषदेत असा प्रकार बघायला मिळणार नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) राजेश खवले यांनी जिल्ह्यात 'झिरो पेंडन्सी' नावाचा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे.

एक महिन्यापूर्वी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्विकारला आहे. सोबतच जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती यांचाही कार्यकाळ संपल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासक पदाचा कार्यभारदेखील राजेश खवले यांच्याकडेच आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेमधील प्रत्येक विभागाकडून फाईल्स यायच्या आणि त्या अनेक महिने पडून राहायच्या. हा प्रकार पाहून नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश खवले यांनी कोणतीही फाईल एका तासापेक्षा अधिक काळ प्रलंबित रहायला नको, अशा सूचना सर्व कर्मचाऱ्यांना दिल्या. त्यामुळे सर्व फाईल संबंधित कर्मचारी सोबत घेऊन येतात आणि सीईओंच्या समक्षच तातडीने पाहणी करून त्यांची सही घेऊन जातात.

गोंदिया जिल्हा परिषदेत 'झिरो पेंडन्सी' उपक्रम

एखाद्या फाईलमध्ये काही त्रुटी असल्यास त्याही लवकरात लवकर दूर करुन फाईल पूर्ण केली जाते. यामुळे प्रतिक्षाधिन फाईल ठेवण्यासाठी जे कपाट बनवण्यात आलेले आहे ते आता चक्क रिकामे दिसत आहे. सीईओंच्या उपक्रमामुळे जनतेची कामे तातडीने निकाली निघत आहेत. जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱयांनी देखील त्यांच्याकडे जनतेची जी कामे प्रलंबित आहेत ती तातडीने निकाली काढावीत, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी दिल्या आहेत. या कामाची सुरुवात सीईओ राजेश खवले यांनी स्वत:पासून केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details