गोंदिया - तहसील कार्यालयाच्या दीड एकर जागेवर ४० कोटी खर्च करून बांधण्यात आलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण आज (मंगळवार) राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात आले. इमारतीमध्ये एकूण २८ कार्यालये एकत्र करण्यात आले आहेत. यावेळी माजी मंत्री राजकुमार बडोले, भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे तसेच आमदार संजय पुराम हे उपस्थित होते.
मागील एका वर्षापासून तयार झालेल्या इमारतीच्या लोकार्पणाचा मुहूर्त आज निघाला असुन इमारतीचे लोकार्पण झाले. इमारतीमध्ये प्रत्येक कार्यालयात एक सारखे फर्निचर बसविण्यात आले असुन ते ९ कोटींचे आहे. तसेच या इमारतीमध्ये स्ट्राँग रूम, उपहार गृह, सेतू कार्यालय आहे.
पहिला मजला -
पहिल्या मजल्यावर उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, तहसील कार्यालय, निवडणूक विभाग, तलाठी कार्यालय, नजूल तलाठी, अप्पर तहसीलदार यांचे कार्यालय असे वेगवेगळे कार्यालये आहेत.
दुसरा मजला -
दुसऱ्या मजल्यावर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, सहाय्यक संचालक निधीलेखा परीक्षक, जिल्हा ग्राहकमंच सहजिल्हा निबंधक, तालुका निरीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय असे वेगवेगळे कार्यालये आहेत.