गोंदिया- कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरीच राहणे अपेक्षित आहे, मात्र नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, शहर वाहतूक पोलिसांकडून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक नियमान्वये कारवाई केली जात आहे. मागील चार दिवासांपासून रोज २०० ते ३०० वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
गोंदियात लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या १७१४ वाहन चालकांवर कारवाई
जिल्हा वाहतूक पोलिसांनी २३ मार्च ते ८ एप्रिलदरम्यान १ हजार ७१४ वाहन चालकांवर कारवाई करत त्यांच्याकडून ३ लाख ५५ हजार ८०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. यावेळी पोलिसांकडून रोज ४० ते ५० गाड्यांना ताब्यात घेतले जात आहे.
वाहतूक कारवाई
जिल्हा वाहतूक पोलिसांनी २३ मार्च ते ८ एप्रिलदरम्यान १ हजार ७१४ वाहन चालकांवर कारवाई करत त्यांच्याकडून ३ लाख ५५ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. यावेळी पोलिसांकडून रोज ४० ते ५० गाड्यांना ताब्यात घेतले जात आहे. ज्या वाहन चालकांजवळ वाहनाचे पूर्ण कागदपत्र नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. तसेच, विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांकडून समज देण्यात येत आहे.
हेही वाचा-चिचगावमध्ये अपरिचीत फुगा पडल्याने गावकऱ्यांमध्ये भीती