गोंदिया - सध्या देशासह राज्यात कोरोना ससंर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू आहे. या संचारबंदीच्या काळातही अवैध व्यवसायिक आडमार्गाने आपला व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. गोंदिया शहर पोलिसांना 15 मे रोजी कारवाई करुन 30 हजार 150 रुपयांची सुगंधीत तंबाखू जप्त केली आहे. 36 पोत्यांमध्ये ही दारू होती.
गोंदिया पोलिसांच्या कारवाईत 30 हजाराची सुगंधित तंबाखु जप्त - scented tobacco news in gondia
सध्या देशासह राज्यात कोरोना ससंर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू आहे. या संचारबंदीच्या काळातही अवैध व्यवसायीक आडमार्गाने आपला व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे.
![गोंदिया पोलिसांच्या कारवाईत 30 हजाराची सुगंधित तंबाखु जप्त Gondia](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7226620-1068-7226620-1589640919010.jpg)
संचारबंदीमुळे पान व तंबाखुजन्य पदार्थ विक्रीवर निर्बंध आहेत. असे असतानाही मोठ्या प्रमाणात आडमार्गाने त्याची विक्री सुरु आहे. त्यातच शहरातील कृष्णापुरा वार्डातील एका घरात धाड घालून 36 पोती तंबाखू पोलिसांनी हस्तगत केली आहे. धर्मेंद्र महेश चौरसिया (वय 36) यांच्या कृष्णपुरा वार्डातील घरातून 27 पोती किंग तंबाखू (प्रत्येक पोती 4.5 किलो वजन) जप्त केली. याची किंमत 21 हजार 500 रुपये इतकी आहे. लूज तंबाखूची 9 पोती (प्रत्येक पोती 10 किलो ग्रॅम) असा 30 हजार 150 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करुन आरोपीला ताब्यात घेतले आहे. कलम 188, 269 भांदवी अन्वये गुन्हा नोंदवला आहे.