गोंदिया - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात लाकडाऊन आहे. लाकडाऊनमध्ये खरी कसोटी पोलिसांची आहे. परजिल्हा आणि परराज्यातील नागरिकांना जिल्ह्यात प्रवेशबंदी असल्यामुळे सर्वत्र नाकेबंदी करण्यात आली आहे. यामध्ये पोलिसांना मात्र तारेवरती कसरत करावी लागत आहे. त्यांना भर उन्हात ४३ डिग्री तापमानामध्ये आपले कर्तव्य बजावावे लागत आहे. पोलिसांना होणारा उन्हाचा त्रास लक्षात घेता गोंदियाचे जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी नाकेबंदी असलेल्या ठिकाणी हिरव्या कारपेटची नेट लावून पोलिसांचा उन्हापासून बचाव केला आहे.
४५ अंश सेल्सिअल्स तापमानात पोलिसांचा कडा पहारा - ४५ डीग्री सेल्सिअल्स तापमानात पोलिसांचा कडा पहारा
लाकडाऊनमध्ये खरी कसोटी पोलिसांची आहे. परजिल्हा आणि परराज्यातील नागरिकांना जिल्ह्यात प्रवेशबंदी असल्यामुळे सर्वत्र नाकेबंदी करण्यात आली आहे. यामध्ये पोलिसांना मात्र तारेवरती कसरत करावी लागत आहे. त्यांना भर उन्हात ४३ डिग्री तापमानामध्ये आपले कर्तव्य बजावावे लागत आहे.
४५ डीग्री सेल्सिअल्स तापमानात पोलिसांचा कडा पहारा
संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे बंदोबस्ताच्या काळात १६ तास ड्युटी करावी लागते आहे. पोलिसांची ड्युटी तशी दर दिवसाला १२ तासांची असते. मात्र, बंदोबस्ताच्या काळात १६ तासांच्यावर ड्युटीचा वेळ असतो. काही काळ एका ठिकाणी कर्तव्य बजावणे व काही काळ संचार करत नागरिकांना सजग करणे, अशी ही व्यवस्था आहे. सर्वसामान्यांना पोलीस म्हणजे उगीच चौकशा, असे वाटते. मात्र, पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी भर उन्हात उभे राहून आपले कर्तव्य बजावत आहेत.